आजचा प्रश्न: या आहार योजनेचे पालन करण्यास सुरुवात केल्यानंतर जर आम्लता (acidity) झाली तर काय करावे? (३० नोव्हेंबर)
आजचा प्रश्न
प्र: या आहार योजनेचे पालन करण्यास सुरुवात केल्यानंतर जर आम्लता (acidity) झाली तर काय करावे?
उ: काही लोक ज्यांना अतिरिक्त आम्लतेचा त्रास असतो ते आहार योजनेच्या पालन करण्यास सुरुवात करताना थोडे कचरतात.
उलटपक्षी, या आहार योजनेमुळे आम्लतेच्या त्रासापासुन मुक्तता होते.
ज्यांना वरीलपैकी त्रास आहे त्यांनी खालील सूचना अंमलात आणा.
१. ज्या दोनवेळी सर्वात जास्त भूक लागते त्याच वेळी जेवा.
२. आपल्या जेवणाच्या वेळेप्रमाणे कामाच्या वेळा बदला , कामाच्या वेळेनुसार जेवणाच्या वेळा नव्हे.
३.जेवणाच्या वेळा बदलत राहू नका.
४.खूप पाणी प्या.
५.जेवणामध्ये मसालेदार तसेच तळलेले पदार्थ टाळा.
६. कधी कधी असिलोक/रान्तक १५0 mg गोळी घेऊ शकता.
काही दिवसांत आपण स्थिरस्थावर व्हाल! जेंव्हा आपली आम्लतेपासून सुटका होईल तेंव्हा आपली यशोगाथा आम्हाला पाठवा.
(हिंदी व मराठी अनुवाद: श्री. अरुण नावगे)

