आजचा प्रश्न : ‘मुलभुत चयापचय दर'(basal metabolic rate) म्हणजे काय? तो कश्यावर अवलंबून असतो? त्याचा आपल्या वजनावर काय परिणाम होतो?

0

आजचा प्रश्न : ‘मुलभुत चयापचय दर'(basal metabolic rate) म्हणजे काय? तो कश्यावर अवलंबून असतो? त्याचा आपल्या वजनावर काय परिणाम होतो?

उत्तर: 'मूलभुत चयापचय दर' म्हणजेच आपण विश्राम करत असताना आपले शरीर कार्यरत राहण्यासाठी जसे श्वासोश्वास, रक्ताभिसरण, शारीरिक ताप नियमन, पेशिवृद्धि, मेंदू तसेच मज्जातंतु कार्य आणि स्नायुंचे आकुंचन-प्रसरण करण्यासाठी जी उर्जा लागते ती, तिला कॅलरीत मोजतात.

*आपण जे खातो व पितो त्याचे रूपांतर ऊर्जेत करण्याच्या प्रक्रियेला चयापचय असे म्हणतात.*या जटिल जैव-रासायनिक प्रक्रियेत खाद्य तसेच पेय पदार्थातील उष्मांक व प्राणवायु यांच्या संगमातून आपल्या शरीराला लागणारी ऊर्जा निर्माण होते. आपण विश्राम करत असताना सुद्धा श्वासोश्वास, रक्ताभिसरण, संप्रेरक नियमन, पेशिवृद्धि व दुरुस्ती या सारख्या छुप्या कार्यांसाठी ऊर्जेची गरज असते.
वरील पायभूत कार्यांसाठी जो उष्मांक लागतो त्यालाच 'मूलभूत चयापचय दर' असे म्हणतात. त्यालाच 'चयापचय' असेही म्हणू शकतो.
खालीलपैकी अनेक घटकांवर 'मूलभूत चयापचय दर' अवलंबून असतो:
१.आपल्या शरीराचे आकारमान व रचना:
ज्यांचे आकारमान मोठे असते व स्नायु जास्त असतात त्यांचे शरीर जास्त उष्मांक खर्च करते अगदी विश्राम करत असताना सुद्धा.
*२.आपले लिंग:*जर समवयस्क व समान वजनाच्या पुरूष व स्त्री मध्ये तुलना केल्यास पुरुषांच्या शरीरात मेद कमी व स्नायू जास्त असतात त्यामुळे जास्त उष्मांकांचे ज्वलन होते.
*३.आपले वय:*जसे आपले वय वाढते तसे स्नायुंचे प्रमाण कमी होते व चरबीचे प्रमाण वाढते त्यामुळे उष्मांक ज्वलन कमी होते.
रोजच्या एकूण उष्मांकापैकी मूलभूत चयापचय दरा साठी ७० टक्के उष्मांकाचे ज्वलन होते.
मूलभूत चयापचय दरा शिवाय इतर दोन घटक आहेत ज्यावर रोज आपल्या शरीरातील ज्वलन होणारा उष्मांक ठरतो.
१.खाद्य प्रक्रिया (thermogenesis):
आपण खाल्लेल्या पदार्थाचे पाचन, शोषण, वहन तसेच संग्रहण करण्यासाठीही उष्मांकाची गरज असते. यासाठी १०० ते ८०० उष्मांक लागतात. आपल्या आयुष्यभरात खाद्य प्रक्रियेसाठी आवश्यक उष्मांकांचे प्रमाण स्थिर रहाते. त्यात जास्त बदल होत नाही.
२.शारिरिक हालचाल:
शारिरिक हालचाल अथवा व्यायाम- जसे टेनिस खेळणे, बाजारहाटीसाठी चालणे, पाळीव कुत्र्या मागून पळणे, आणि इतर व्यायाम प्रकारां साठी उरलेल्या उष्मांकांचे ज्वलन होते.
शारिरिक हालचाल हाच एक परिवर्तनशील घटक आहे जो ठरावतो कि दिवसभरात किती उष्मांकांचे ज्वलन होईल.

चयापचय व वजन:

आपल्या वाढलेल्या वजनासाठी चयापचय ही एक सोप्पी सबब असू शकते. परंतु चयापचय ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, आपल्या शरीरात अनेक प्रणाली आहेत ज्याने वैयक्तिक गरजेनुसार चयापचय प्रक्रियेचे नियनमन होते. काही दुर्मिळ प्रकरणात वैद्यकीय अडचणीमुळे झालेले संथ चयापचय हे वजनवाढीचे कारण ठरू शकते. जसे कुशिंगचे लक्षण अथवा अकार्यक्षम गलग्रंथी (hypothyroidism).
आपले वजन तेंव्हा वाढते जेव्हा आपण ज्वलन होणाऱ्या उष्मांकांपेक्षा अधिक खातो किंवा खातो त्यापेक्षा कमी उष्मांकांचे ज्वलन करतो.

रक्ततील 'इंसुलिन' हा आणखी एक महत्वाचा घटक आहे, जो ठरवतो की ऊर्जा निर्मितिसाठी शर्करा वापरायची की मेद आम्ल.
जर जास्त असेल तर शर्करा वापरली जाते व कमी असल्यास मेद आम्ल वापरले जाते.
आपल्या आहार योजनेतील भोजनाच्या कमी वारंवारतेमुळे शरीरातील इंसुलिनचे प्रमाण कमी होते त्याचमुळे उर्जानिर्मितिसाठी शरीरातील चरबीचे ज्वलन होते. व आपले वजन तसेच पोटाचा घेर कमी होतो

तेंव्हा वजन कमी करण्या साठी चयपचयीला दोष न देत बसता,काही कृती करा.

(लेखक: डॉ. जगन्नाथ दिक्षित)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts