आजचा प्रश्न : मी दिवसातून दोन वेळा 5 किमी चालतो हे योग्य आहे की अयोग्य?
उत्तर: आमच्या सल्ल्यानुसार, ह्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी 45 मिनिटात 4.5 किमी चालणे ♀️♂️अनिवार्य आहे. जर एखादी व्यक्ती जास्त चालत असेल तर होणारा लाभ नक्कीच जास्त असेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही सुचवतो तो डाएट प्लॅन नाही, ही एक जीवनशैली आहे. याचा अर्थ तुम्ही या जीवनशैलीचे पालन संपूर्ण आयुष्यभर आनंदाने करू शकणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याच गोष्टी करा ज्या तुम्ही आयुष्यभर करू शकाल. जर तुम्ही आयुष्यभर 10 किमी चालू शकणार असाल तर काहीच प्रश्न नाही ! असे व्हायला नको की तुम्ही आत्ता 10 किमी चालत आहात आणि काही आठवड्यानी चालणे पूर्ण बंद झाले आहे.