आजचा प्रश्न : ‘मधुमेही’ व्यक्ती रक्तदान करू शकते का? (३० ऑगस्ट २०२५)

0

आजचा प्रश्न : ‘मधुमेही’ व्यक्ती रक्तदान करू शकते का? (३० ऑगस्ट २०२५)

आजचा प्रश्न

प्रश्न – ‘मधुमेही’ व्यक्ती रक्तदान करू शकते का?
लिंबकर ७२-EWL – DM

उत्तर – सामान्य नियमानुसार रक्तपेढ्यांनी कोणताही आजार असलेल्या दात्यांपेक्षा निरोगी दात्यांकडून रक्त घ्यावे.
जेव्हा रक्तदानाची वेळ येते तेव्हा, अनेक अटी तुम्हांला अपात्र ठरवू शकतात. दुर्दैवाने ‘मधुमेही’ व्यक्ती ह्या बऱ्याचदा रक्तदानासाठी पात्र नसतात.
जी व्यक्ती रक्तदान केल्यामुळे धोकादायक पातळीवर येईल अशा कोणाकडूनही रक्त स्वीकारायचे नाही असे सामान्य धोरण आहे.
ज्या व्यक्तीचे ‘पूर्व – मधुमेही’ असे निदान झाले आहे व आजपर्यंत त्यांना कोणताही हृदय संबंधित त्रास नव्हता असे रक्तदान करण्यास पात्र आहेत.
जे लोक इन्सुलिन घेतात त्यांना रक्तदानाची परवानगी नाही. (ज्यामध्ये टाईप १ व टाईप २ प्रकारातील मधुमेही व्यक्तींचा समावेश आहे.) रक्तदानामुळे इन्सुलिनच्या पातळ्यांवर होणारा परिणाम हा दात्याच्या आरोग्यासाठी धोकादायक समजला जातो.
जे लोक मधुमेहासाठी औषधोपचार घेतात व मागील ४ आठवड्यात त्यांच्या औषधांमध्ये बदल झाला नसेल, तर ते रक्तदान करू शकतात. मधुमेह असलेले व ज्यांनी हृदयविकार अनुभवलेला आहे असे लोक बहुतांश वेळा रक्तदानासाठी अपात्र ठरतात. त्यात खालील व्यक्तींचा समावेश आहे:-
– हृदयाच्या त्रासामुळे चक्कर व अंधारी येणारे
– हृदयविकाराचा झटका आलेले
– रक्तवाहिन्या अरुंद झाल्याने किंवा त्यात अडथळा आल्याने शस्त्रक्रिया झालेले
म्हणून, जर तुम्ही टाईप २ प्रकारच्या मधुमेही व्यक्ती असाल, तर तुम्ही रक्तदान करू शकता. जर –
१) हे ☝️सोडल्यास (हृदयाचा कोणताही त्रास) तुम्ही रक्तदान करण्यास पात्र आहात.
२) तुम्ही इन्सुलिन घेत नसाल-
३) १ महिन्याहून अधिक काळ तुम्ही त्याच गोळ्या त्याच प्रमाणात घेत असाल-
४) तुम्हांला कोणत्याही प्रकारचा हृदयाचा त्रास नसेल तर-
ह्याशिवाय हे समजून घ्या की, तुमचे रक्त स्वीकारण्याबाबतचा अंतिम निर्णय हा रक्तपेढीवरील देखरेख करणाऱ्या ‘रक्त संक्रमण’ अधिकाऱ्यांचा आहे.

(मराठी अनुवाद – नीलिमा टिपरे)
वाशी – नवी मुंबई

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts