आजचा प्रश्न : दिवसातून एकदाच जेवले तर चालेल का? ( १० फेब्रुवारी२०२६ )

0

आजचा प्रश्न : दिवसातून एकदाच जेवले तर चालेल का? ( १० फेब्रुवारी२०२६ )

आजचा प्रश्न : दिवसातून एकदाच जेवले तर चालेल का?

प्रश्न: दिवसातून एकदाच जेवले तर चालेल का?
उत्तर : शरीरक्रिया शास्त्राच्या दृष्टीने असे केल्याने कोणतेहीनुकसान होणार नाही. काही लोक एकभुक्त राहतात व पूर्णत: निरोगी जीवन जगतात. पण वजन कमी करण्यासाठी तुम्ही असे करणार असाल तर काही गोष्टी समजून घ्या. एक म्हणजे दिवसातून एकदाच जेवणे तुम्हालादीर्घकाळासाठी जमणारआहे का? कारण भुकेचे निमित्त होऊन तुम्ही मिळेल तो पदार्थ एकदा जेवल्यानंतर केव्हाही खाल. हे दुस-या वेळचे खाणे कोणत्याच वेळापत्रकानुसार नसेल व याची परिणती शरीराला उपासमारीची शक्यता असल्याचा इशारा जाण्यात व प्रतिसाद म्हणून शरीराने ऊर्जा साठवण्यात होईल व तुमचे वजन कमी व्हायच्या ऐवजी वाढेल!

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts