आजचा प्रश्न : PCOD ची समस्या (तारीख 10th Aug 2025)
आजचा प्रश्न
प्रश्न : मला PCOD ची समस्या आहे . माझी मासिक पाळी अनियमित आहे . हा डाएट प्लॅन माझ्यासाठी योग्य आहे का ?
उत्तर : बऱ्याच महिलांना ही समस्या असते . आमच्या डाएट प्लॅन अश्या सर्व महिलांसाठी उपयुक्त आहे .त्यांनाही वजन कमी करणे आणि मधुमेहापासून बचाव करण्यासाठी याचा जरूर उपयोग होईल .
अकलूज येथील प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ ,डॉ. वंदना गांधी यांचा PCOD/PCOS च्या रुगणांचा अनुभव सर्वांना सांगण्यात मला अतिशय आनंद होत आहे. हे वाचून नाक्कीची तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
डॉ. गांधी मॅडम यांचा संदेश:
“वजन कमी करणे आणि मधुमेह प्रतिबंध” या स्तुत्य सामाजिक उपक्रमातील योगदानाबद्दल डॉ. दीक्षित यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
त्यांच्या डाएट प्लॅनच्या तंतोतंत पालनाने अनेकांना अद्भुत यश मिळाले आहे .
मी स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ असल्याने दैनंदिन कामात मला अनेक पी .सी ओ .डी ने ग्रस्त असलेल्या सगळ्या वयोगटातील महिला पाहण्यात येतात .लठ्ठपणा या आजारात आगीत तेल ओतण्याचे काम करतो. डॉ. दीक्षित सरांचे ” विनासायास वेट लॉस ” हे पुस्तक वाचून आणि सरांचे व्याख्यान ऐकून मी माझ्या मुलं होण्यास
अडचण असणाऱ्या विशेषकरून लठ्ठ आणि पी.सी. ओ .एस असणाऱ्या महिलांसाठी हा डाएट प्लॅन वापरण्यास सुरुवात केली – ऑगस्ट २०१६ पासून.
डॉ. दीक्षित सरांच्या सन्मानार्थ मी यास “जे . व्ही पद्धत ” असे नाव दिले आहे. .
माझ्या नोंदी आणि निरीक्षणाप्रमाणे प्रामाणिकपणे हा डाएट प्लॅन पाळणाऱयांचे जवळ-जवळ ८-१० किलो वजन कमी झाले आहे. शिवाय यातील काहींमध्ये औषधांविना नियमित बीजांड निर्मिती होत आहे. . ४-५ महिन्यांनी मासिक पाळी येणाऱयांमध्ये त्यात नियमितपणा आला आहे . ३०-४० पी.सी .ओ .डी च्या रुग्णांपैकी २ जणी गर्भवती सुद्धा राहिल्या आहेत. . मला खात्री आहे कि या “जे व्ही ” पद्धतीने नुसतेच वजन कमी झालेले नाही तर नैसर्गिक हॉर्मोनल संतुलन प्रस्थापित झाले आहे.
यासाठी खूप व्यवस्थित नोंदणी आणि अभ्यास आवश्यक आहे. केवळ या पद्धतीच्या अवलंबनाने अनेकींच्या आयुष्यात मातृत्वाचे स्वप्न साकार होऊ शकते.
मी या अभियानास मनापासून शुभेच्छा देते.
डॉ. वंदना गांधी ,गांधी हॉस्पिटल , अकलूज