आजचा प्रश्न : आपण गव्हाचे पदार्थ खाणे बंद करणे आवश्यक आहे का? ‘व्हीट बेल्ली’ बद्दल आपले काय मत आहे?
आजचा उत्तर
उत्तर: या प्रश्नाबद्दल आपले आभार! गेल्या काही दिवसांत आपल्या गटातील जवळ जवळ शंभर सभासदानी एक संदेश फॉरवर्ड केला, जो जेवणात गहु वर्ज्य करण्यासाठी अतिशय आग्रहाने सांगतो.
त्याच संदेशात असेही म्हटले आहे की, गव्हाचे सेवन वर्ज्य केल्याने २०-३० पौंड (९-१४ किलो) वजन तर कमी झालेच पण इतर अनेक रोगांपासून मुक्ती मिळाली.
आपण यातील मूलभूत माहितीकडे वळुया!
या संदेशात डॉ. विलियम डेविस यांच्या “व्हीट बेल्ली” तसेच डॉ डेव्हिड पर्लमटर यांच्या “ग्रेन ब्रेन” या दोन पुस्तकांचा संदर्भ आहे. हि दोन पुस्तके एक प्रकारे डॉ. एटकिन्स यांच्या ‘एटकिन्स आहार’ याचे समर्थन करतात जो फक्त मांस, मच्छी, अंडी इत्यादिच्या सेवना विषयी आग्रह धरतात. त्यांच्या म्हणण्यानुसार शरीरातील कर्बोदिके कमी करा आणि प्रथिने व मेद वाढवा.
सत्य काय आहे?
१) पुणे येथील एक संशोधक प्रा. मिलिंद वाटवे यांच्या ” डोव्हस्, डिप्लोमेट्स अँड डायबिटीज” या पुस्तकात दिल्या प्रमाणे पुराव्यानिशी सिद्ध केले आहे की, जगात अश्या जमाती आहेत की त्या आहारात ८५% कर्बोदिके, तर काही ७०% प्राणी-मेद किंवा १००% मांस मच्छी खातात परंतु त्यांना स्थुलता अथवा टाइप 2 चा मधुमेहाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता फारच कमी आहे.
प्रत्यक्षात, टाइप २ मधुमेहाचा प्रादुर्भाव भारत तसेच अमेरिका येथे जास्त आहे जेथे वास्तविकतः लोक जवळपास “संतुलित” आहाराचे सेवन करतात.
तेंव्हा एका विशिष्ट खाद्यान्नाला दोषी ठरवणे योग्य नव्हे!
*२) पूर्वीचे आणि आत्ताचे गहू यामध्ये फार फरक आहे का?*डॉ. डेविस यांच्या म्हणण्यानुसार जैविकरित्या संशोधित गव्हाच्या बदलाची तुलना चिम्पांजी ते मानव या बदलाशी केली जाऊ शकते. हे सत्या पासून फारच दूर आहे!
गव्हाच्या जैविक बदलामुळे त्याचे कृषि उत्पन्न वाढले परंतु त्याच्या जीव-रासायनिक गुणधर्मात काहीही फरक पडला नाही.
त्यात पूर्वी प्रमाणेच दर १०० ग्राम मागे ११ ते १२ ग्राम प्रथिने व ७१ ग्राम कर्बोदिके असतात. आणि त्यातील प्रथिनांमध्ये तेच ग्लुटेन तसेच ग्लियादिन है घटक असतात.
या ठिकाणी डेविस यांची पूर्णपणे चूक आहे.
३) गव्हाच्या ग्लायसेमिक निर्देशकाबद्दलचे सत्य काय?*या वायरल झालेल्या संदेशात असा उल्लेख आहे की गव्हाच्या ब्रेडचे दोन काप खाल्ल्याने रक्तात होणारी शर्करा निर्मिति ही स्नीकर बार खाण्याने निर्मित शर्करेपेक्षा जास्त असते! ग्लायसेमिक निर्देशांक हा एखादा खाद्य पदार्थ खाल्ल्यास रक्तामध्ये किती शीघ्रतेने शर्करा निर्मिति होते ते दर्शवतो. *या संदर्भात सर्व पाठ्यपुस्तकें गहु, तांदूळ व ज्वारी या सारख्या एकदल धान्यांची गणना ५५ पेक्षा कमी अश्या अल्प ग्लायसेमिक निर्देशांक असलेल्या श्रेणित करतात.
बासमती तांदूळ व ब्राउन राइसचा ग्लायसेमिक निर्देशांक ५६ ते ६९ असतो तर कॉर्न फ्लेक्स, शिजवलेले बटाटे, काही प्रकारचे तांदूळ, कैंडी बार तसेच अतिमधुर पदार्थांचा ग्लायसेमिक निर्देशांक ७० पेक्षा जास्त असतो.
या ठिकाणी एक खूबी आहे! *जर तुम्ही पुर्ण गव्हाच्या पिठाचे पदार्थ खाल्ल्यास ग्लायसेमिक निर्देशांक कमी असतो तेच जर संशोधित गव्हाच्या पिठापासुन बनवलेले व्हाइट ब्रेड खाल्ल्यास ग्लायसेमिक निर्देशांक जास्त असतो.
अमेरिकन तसेच यूरोपियन लोक व्हाइट ब्रेड खातात परंतु भारतात आपण पूर्ण गव्हाच्या पीठापसुन बनवलेल्या चपात्या किंवा रोट्या खातो.
त्यामुळे या रक्तशर्करा निर्मितिच्या आघाडीवरही डॉ. डेविस यांचे म्हणणे वस्तुस्थितिला धरून नाही
आपल्या आहारात सलाड, मोड आलेली कडधान्ये, फळे , धान्ये तसेच भाज्या यांचे मिश्रण असते. त्यामुळे आपण व्हाइट ब्रेड ऐवजी चपाती किंवा भात खाल्ल्यास या मिश्रणाच्या ग्लायसेमिक निर्देशांकामध्ये फारसा फरक पडत नाही.
४) गव्हाच्या सेवनाने होणारे संभावित रोग तसेच सेवन वर्जित केल्यामुळे चमत्कारिकरित्या बरे झालेल्या रोगांचे काय?
डॉ. डेविस यांनी या संदर्भात कोणतेही संशोधन केलेले दिसत नाही. त्यांनी केलेले सर्व दावे हे त्यांच्या किंवा त्यांच्या रुग्णांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहेत. हे फसव्या शास्त्राचे उत्तम उदाहरण आहे.
आत्तापर्यंत गव्हापासून संभावित केवळ एक दुर्मिळ डाइरिया रोग ज्ञात आहे. भारतात त्याचा प्रादुर्भाव ०.३ ते ०.५ % इतका कमी आहे. इतर कोणताही रोग गव्हामुळे होऊ शकतो हे अजून तरी सिद्ध झालेले नाही.
त्यामुळे डॉ डेविस यांचे दावे मान्य करण्यासारखे नाहीत.
५) आपण गहु खाणे बंद केले तर के होईल?
भारतात, दक्षिण भारतीय लोक तांदूळाचे पदार्थ खातात, गव्हाचे पदार्थ फारच कमी खातात, या उलट उत्तर भारतीय लोक जास्त करुन गव्हाचेच पदार्थ खातात. उपरोधिकरित्या, या दोन्ही ठिकाणच्या स्थुलता तसेच मधुमेहाने प्रभावित लोकांच्या संख्येत फारसा फरक नाही.
६) अंतिम निकाल:
“व्हाइट बेल्ली” संदेशात केलेल्या कोणत्याही दाव्यांत तथ्य नाही.
संशोधित पीठापसुन बनवलेल्या व्हाइट ब्रेड पेक्षा होल व्हीट ब्रेड केव्हा ही चांगले, परंतु गव्हाचे सेवन वर्ज्य केल्यास आपल्या वजनात चमत्कारित घट होईल किंवा मधुमेहापासुन मुक्ति मिळेल ही अपेक्षा करणे संयुक्तिक ठरणार नाही.
प्रिय सभासदहो, आम्ही आमच्या आहार योजनेत दिवसातुन दोन वेळा काहीही आणि सर्व काही खाण्याची मुभा देतो आणि त्यामुळे वजनात तर घट होतेच परंतु मधुमेह होण्याचे टाळता येते.
आपल्याला स्वतः वर प्रयोग करण्याची संधी आहे….
पुढचे तीन महीने गहुपदार्थ खाणे वर्ज्य करा व आपले वजन, HbA1C व फास्टिंग इंसुलिन तपासा.
त्यानंतर पुढचे तीन महीने पुन्हा गहुपदार्थ खा व पुन्हा तापसण्या करा.
मी माझ्या अनुभवाने सांगतो की आपण गहुपदार्थ खा किंवा नका खाऊ काहीही फरक पडणार नाही, जो पर्यंत आपण आमच्या आहार योजनेचे प्रामाणिकपणे पालन करत नाही.
मी आशा करतो की मी आपल्या सर्व शंकांचे निरसन केले आहे…..
-डॉ जगन्नाथ दीक्षित