आजची यशोगाथा : शगुफ्ता शेख
परिचय पत्र
नाव : शगुफ्ता शेख
वय: ४९ वर्षे
उंची: १५५ सेंमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: सातारा
ग्रुप: गार्डियन्स ग्रुप, ९ वे चॅलेंज
मोबाईल: ९०१११९९३९२
मला बीपी, मधुमेह आणि सांधेदुखीचा त्रास होता. एके दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून १६ जुलै २०२६ रोजी डॉक्टर दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांच्या चॅलेंजबद्दल मला माहिती मिळाली आणि मी त्यात सहभाग घेतला. सुरुवातीच्या दिवसांत मला थोडी अडचण आली, पण नंतर ते माझे रूटीन बनले; जसे की—५५ मिनिटांच्या आत जेवण संपवणे. दिवसातून दोन वेळा जेवणामध्ये सर्वात आधी ड्रायफ्रूट्स, सॅलड, प्रोटीन ज्यामध्ये उकडलेली अंडी किंवा स्प्राउट्स आणि त्यानंतर भाजी, पोळी खात असे. दोन जेवणांच्या मध्ये फक्त पाणी पित होते आणि डॉक्टर रत्ना मॅडमचे व्यायाम मी युट्यूबवर बघून करत असे.
असा एक महिना लोटला. जेव्हा पहिल्या महिन्याचे मी ब्लड टेस्ट केले, तेव्हा माझ्या एचबीए१सी आणि फास्टिंग इन्सुलिन मध्ये बदल झाला नव्हता, पण माझे वजन दोन किलो कमी झाले. मला खूप आनंद झाला.
दुसऱ्या महिन्यातही मी योग्य डाएट घेतला, पण व्यायाम करण्यासाठी मला वेळ मिळाला नाही कारण घरात लग्न होते आणि त्यानंतर मला व्हायरल फीवर झाला. दहा दिवस कोणताही व्यायाम करता आला नाही, तरीही माझे वजन एक किलो कमी झाले आणि एचबीए१सी ७.९% आला. मला खूप आनंद झाला. मला आता थोडे हलके-फुलके वाटू लागले आणि या जीवनशैलीचे पालन करण्यात मजा येऊ लागली. ग्रुपचे अॅडमिन श्रीनिवास बोलाबत्तीन सर आणि स्वाती कुलकर्णी मॅडम यांनी खूप सहकार्य केले. वेळोवेळी आम्हाला फोन करून संपूर्ण माहिती दिली. मी त्यांचे आभार मानते. आम्हा लोकांना दररोज रात्री गुगल फॉर्म भरावा लागत असे, ज्यामध्ये संपूर्ण दिवसाची माहिती असे. आठवड्यातून एकदा संडे क्विझ असायची आणि प्रत्येक आठवड्यात वीकली टास्क असायचा, ज्यामध्ये खूप मजा यायची, कॉम्पिटिशन असायचे. यावरून मला शाळेच्या दिवसांची आठवण यायची.
९० दिवसांनंतर चॅलेंजच्या शेवटी निकाल खालीलप्रमाणे आले—
एचबीए१सी: सुरुवातीचे ८.० ➡️ वर्तमान ७.७ (.३ ने कमी)
वजन: सुरुवातीचे १०३ किलोग्रॅम ➡️ वर्तमान ९८ किलोग्रॅम (५ किलो कमी)
पोटाचा घेर: सुरुवातीचे १२० सेंमी ➡️ वर्तमान १०९ सेंमी (११ सेंमी कमी)
फास्टिंग इन्सुलिन: सुरुवातीचे २४.६३ ➡️ वर्तमान २१.६३ (३ युनिट कमी)
डाएटवर मी नियंत्रण मिळवले आहे; जसे की—मला वारंवार खाण्याची लालसा कमी झाली आहे आणि आता मी स्वतःला शिस्तीत ठेवते. माझे वजनही बरेच कमी झाले आहे.
मी मनापासून डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सर आणि सर्व अॅडमिन्सचे आभार मानते. मला डॉक्टर दीक्षित सर यांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी आपल्या भारतवर्षासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. डॉक्टर दीक्षित जीवनशैलीमुळे लोकांना खूप जास्त फायदा झाला आहे आणि ही जीवनशैली पूर्णपणे विनामूल्य आहे.
आता मी पुढेही या जीवनशैलीचे पालन करेन आणि स्वतःला फिट ठेवीन, हे माझे वचन आहे. धन्यवाद!
(मराठी अनुवाद: श्रीनिवास बोलाबत्तीन)


