आजची यशोगाथा : नामदेव धनवटे
परिचय पत्र
नाव: नामदेव धनवटे
उंची: १७२ सेमी
वय: ४४ वर्ष
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: खाजगी नोकरी
समूह: अचिव्हर्स
मोबाइल: ७५८८६१०१९७
मला गेल्या २ वर्षांपासून वजन वाढ, सतत थकवा, पायदुखी, शुगर आणि कोलेस्ट्रॉल असंतुलन या समस्यांमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या.
मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांचे चॅलेंज बद्दल माहिती माझे मित्र संदीप सकुंडे यांच्या कडून मिळाली. हे चॅलेंज जुलै पासून सुरू होणार असल्याचे कळल्यावर मी श्रीकांत सरांशी संपर्क करून सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. परंतू खरी कसोटी ९० दिवसात येणारे रक्षाबंधन, गौरी गणपती असे गोड सणांचे महिने असल्यामुळे मी हे करू शकेल याची कुटुंबीय आणि आप्त मित्रांना अजिबात खात्री नव्हती. पण मी मात्र पूर्ण मनाने हे चॅलेंज स्वीकारण्याचे मनोमन ठरवले.
मी रोज दोन वेळा जेवणाचे फोटो ग्रुपवर शेअर केले. माझ्या जेवणात मी रोज ज्वारी, बाजरी, नाचणी, भिजवलेले शेंगदाणे, मोड आलेली कडधान्ये आणि दररोज अक्रोड- बदाम यांचा समावेश केला. तळलेले पदार्थ, बिस्कीट, बेकरी पदार्थ, साखरेचा चहा पूर्ण बंद केला.
रोज डॉ. दीक्षित यांनी सांगितलेला ४५ मिनिटे चालणे + दोन वेळा जेवण ही सवय अंगीकारली. व्यायाम आणि चालण्याचे अपडेट्स वेळेवर टाकले.
पहिल्या महिन्यात मला ३.५ किलो वजन कमी झाल्याचा आणि थकवा गायब झाल्याचा बदल दिसला. पोट हलके वाटू लागले आणि धावताना दम कमी लागला.
पुढील महिन्यांमध्ये अजून प्रगती झाली. कंबर १०५ वरून ९५ सेमी वर आली. वजन आणखीन कमी होऊन कमरेचा घेरा बराच कमी झाला.
९० दिवसांनंतरचे अंतिम निकाल सोबत दिलेल्या चार्ट मधे आहेत.
– इतर सुधारणा: घोरण्याची सवय कमी झाली, झोप सुधारली, कुठल्याही औषधाची गरज लागली नाही, आत्मविश्वास वाढला, ऊर्जा वाढून आळस कमी झाला.
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे: वजन कमी करणे म्हणजे उपाशी राहणे नाही, तर योग्य वेळी, योग्य अन्न, योग्य प्रमाणात खाणे आहे. खाण्याच्या लालसेवर नियंत्रण मिळवता येते आणि हीच शिस्त आपल्याला असणाऱ्या आजारापासून स्वातंत्र्य देते.
हे फक्त डाएट नाही, तर जीवनशैली आहे जी आम्हाला डॉ. दीक्षित सरांनी कायम निरोगी राहण्यासाठी दिली आहे.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित सर आणि माझ्या अचिव्हर्स ग्रुपचे शिस्तप्रिय अॅडमिन, श्रीकांत सर आणि शालिनी नगराळे मॅम तसेच सर्व सदस्यांचा, त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा मनापासून आभारी आहे.
आता ही सुरुवात मी माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आजीवन जीवनशैली बनवली आहे.
(मराठी संपादन आणि पुनर्लेखन: अनिरुद्ध दिवेकर)


