आजची यशोगाथा : मनीषा वायचळ (१६ नोव्हेंबर २०२६)

0

आजची यशोगाथा : मनीषा वायचळ (१६ नोव्हेंबर २०२६)

परिचय पत्र

नाव: मनीषा वायचळ
उंची: १५२ सेमी
वय: ५७ वर्षे
निवास: गादियाविहार रोड, छ. संभाजीनगर
व्यवसाय: सरकारी अधिकारी
समूह: एक्सप्लोरर्स
मोबाईल: ९४२२२०६१३१

मला वजन वाढ, सांधेदुखी इ. या समस्यांमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या. मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांचे चॅलेंज बद्दल सौ. अनिता बाहेकर ताईंद्वारे माहिती मिळाली.
हे चॅलेंज १६ जुलै पासून सुरू होणार असल्याचे कळल्यावर मी ठाम निर्णय घेतला. कुटुंबीय वाट बघतच होते कि असं काही चॅलेंज यावं आणि व्यवस्थित जीवनशैली नी माझं वजन कमी व्हावं. मी पूर्ण मनाने हे चॅलेंज करण्याचे ठरवले.
मी या पूर्ण ९०दिवसात पूर्ण शिस्त पाळली व जेवणाचे फोटो जसे जमतील तसे शेअर केले पण जे आणि जसं सांगितल्याप्रमाणे स्वयंपाक करत होते आणि सांगितलेल्या क्रमाने जेवत होते. व्यायाम/क्रियाकलाप हे समूहावर अपडेट केले. मी रोज घरी सकाळी ट्रेनर च्या मार्गदर्शना खाली मी १ तास नियमित व्यायाम करते.
पहिल्या महिन्यात माझे वजन कमी २ किलो कमी झालं, साखरेचे प्रमाण कमी असा बदल दिसला.
पुढील महिन्यांमध्ये अजून प्रगती झाली व वजन २ किलो नी कमी झाले व जीवनशैलीत छान बदल झाला.
९० दिवसांनंतरचे अंतिम निकाल चार्ट मधे दिलेले आहेत.

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे: खाण्याच्या लालसेवर खुपच फरक पडला, नियंत्रण आलं. वेळेवर आणि सांगितल्याप्रमाणे पदार्थाच्या क्रमाने जेवायची शिस्त लागली. गुडघा थोडा दुखत होता तो पण कमी झाला. वजन कमी झाल्यामुळे जुने ठेवलेले न येणारे ड्रेस येताहेत. फोटो छान येताहेत. आत्मविश्वास वाढला. सकाळी लवकर ५.१५ ला उठते आणि रात्री १० पर्यंत काम चालते तरीही उत्साहच वाटतो. प्रवास खुप होतो तरी आता दमल्यासारखे नाही वाटत.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित सर आणि अनघा मॅडम, अंजली यांची मनापासून आभारी आहे.
डॅा. दीक्षित सरांचे हे चॅलेंज सुरू करायच्या आधी मी भाकरी ला मस्त तूप मीठ लावून पालेभाजी बरोबर खात होते, भाताचे प्रकार व भात पण भरपूर खात होते, गोड खूप आवडत होतं, यातच स्वर्गीय आनंद वाटत होता पण आता डॉ दीक्षित सरांच्या डायटनुसार कळतंय की आपण कार्बोहायड्रेट्सच किती खात होतो. खाण्याचा आवडता मोह म्हणजे तूप मीठ भात, गोड पदार्थ खूप आवडायचे पण ते आता बंद झालेत.
आधी मी रोज एक डाळिंब खात होते. आता हे आव्हान सुरू झाल्यापासून तर इतके छान डाळिंब बाजारात यायला सुरूवात झाली आहे पण मला स्वतःला सांगावं लागतं कि हे आव्हान चालू असेपर्यंत डाळिंबाकडे बघायचं पण नाही.
अंजली मॅडम ना रोज १० वाजता छान छान पाककृती पाठ्वण्याकरता धन्यवाद त्यामुळे स्वयंपाकाला आता काय करावं हा प्रश्न पडत नाही.
मी *डॅा दीक्षित सर आणि टीमची खुप आभारी आहे. अनघा मॅडमचे विशेष आभार. प्रत्येकाचे डायट बारकाईने चेक करणे, गूगल फॉर्म विषयी रोज आठवण करून देणे, त्यानंतर आठवड्याची ऍक्टिव्हिटी करून घेणे ह्या गोष्टी तर आहेतच आणि त्यांचं वयक्तिक मार्गदर्शन आम्हाला लाभतं ही खुप मोठी गोष्ट आहे.

(संपादन आणि पुनर्लेखन: अनिरुद्ध दिवेकर)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts