आजची यशोगाथा : जयंत महाराव (१४ नोव्हेंबर २०२६)
परिचय पत्र
नाव: जयंत महाराव
उंची: १६४ सेमी
वय: ७१ वर्ष
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: निवृत्त, बॅंक ऑफ महाराष्ट्र
समूह: वॉरीयर्स
मोबाईल: ९८६०८१९९१०
मला २००९ मधे मधुमेह आहे असं सांगितलं गेलं. तेव्हा माझी जेवणानंतरची शुगर फक्त १५२ होती. मधुमेह ची सुरुवात आहे व सध्या औषधाची आवश्यकता नाही असे सांगितले होते. नियमित बॅडमिंटन, सिंहगड चढणे, दररोज टेकडीवर पाच ते आठ किलोमीटर फिरणे सुरू होते, त्यामुळे दुर्लक्ष केले गेले. शुगर वाढत गेली. व जास्त औषध घेऊन काही दुष्परिणाम सुरू झाले. डिसेंबर २५ अखेरीस एचबीए१सी ची पातळी १०.४% झाली. मनातून हादरलो होतो. डायबीटीस रिव्हर्सल दावा करणाऱ्या दोघा / तिघांच्या कडे गेलो. पण खुप पैसे खर्च करून पाहिजे तसा परिणाम होत नव्हता व १०.४% ही पातळी धोकादायक आहे हे जाणवत होते. नळ स्टॉप चौकात डॉक्टर दीक्षित सरांचे केंद्र आहे हे समजले. एप्रिल मधे सरांना भेटलो. कोणतेही औषध न वाढवता ६/८ महिन्यात खुप फरक पडेल असा विश्वास डॉक्टर दीक्षित सरांच्या बोलण्यातून मिळाला.
मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांचे चॅलेंज बद्दल माहिती यूट्यूब द्वारे मिळाली. हे चॅलेंज १६ जुलै २०२६ पासून सुरू होणार असल्याचे कळल्यावर मी ठाम निर्णय घेतला. कुटुंबीय आणि मित्रांना खात्री नव्हती, विशेषतः गणपती व नवरात्र सारख्या सणांमुळे, पण मी पूर्ण मनाने हे चॅलेंज करण्याचे ठरवले.
मी या ९० दिवसांच्या आव्हानात पूर्ण शिस्त पाळली, जेवणाचे फोटो शेअर केले व व्यायाम/क्रियाकलाप अपडेट केले.
दुर्दैवाने मला ४ सप्टेंबर २६ रोजी गुडघ्यातील कार्टिलेज टियर चा त्रास झाला व तेव्हा पासून चालणे पुर्ण पणे बंद आहे.
पहिल्या महिन्यात माझे एचबीए१सी कमी होऊन ८.७ झाले
पुढील महिन्यांमध्ये अजून प्रगती झाली माझे, एचबीए१सी ८.४ झाले
९० दिवसांनंतरचे अंतिम निकाल सोबत दिलेल्या चार्ट मधे दिलेले आहेत.
माझ्या शरीरातील चरबी आणि आंतरअवयवांची चरबी पण ३% कमी झाल्या ज्या कि कधीच कमी होत नव्हत्या. मला वारंवार कफचा त्रास होता. तो बंद झाला. ॲसिडिटी होणे बंद झाले. खोटी भुक लागणे बंद झाले.
सहा महिन्यांत, कोणतेही औषध न वाढवता एचबीए१सी २.४% (या ९० दिवसाच्या अभियानात १%) ने कमी झाले आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे अजून दोन तीन महिन्यांत खुपच फरक पडेल हा विश्वास आहे. आता जबाबदारी माझी आहे. मी डॉ दीक्षित सरांवर विश्वास टाकला व तो सार्थ ठरला. वर्षा अखेरपर्यंत नक्की मधुमेह मुक्त होईन अशी खात्री आहे.
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे: अनेकदा विनाकारण खाणे होतं असे. ती सवय पुर्ण पणे बंद झाली. योग्य खाणे व योग्य वेळी खाणे याची सवय लागली. अयोग्य खाण्या वरचा खर्च कमी झाला. या तीन महिन्यांत दडपणा शिवाय जीवनशैली मधे सकारात्मक बदल झाला आहे. जो या पुढील आयुष्यात कायम राहिल.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित सर आणि लीना पाटील यांचा मनापासून आभारी आहे.
(संपादन आणि पुनर्लेखन: अनिरुद्ध दिवेकर)


