आजची यशोगाथा : पोपट भुजबळ (१७ ऑक्टोबर २०२६)
परिचय पत्र
नाव : पोपट भुजबळ
वय : ७२ वर्षे
उंची : १६५ सेंटीमीटर
व्यवसाय : सेवा निवृत्त अधिकारी, ऑर्डनन्स फॅक्टरी, पुणे
वास्तव्य : विकास नगर, किवळे, देहूरोड, पुणे
समूह: एकलव्य
मोबाईल: ९५९५७०५२६०
मी डॉ दीक्षित जीवनशैली बद्दल मी साधारण २०२० पासून ऐकून होतो. परंतु त्यावेळेस मला मधुमेहासंबंधी काही फारशी समस्या नव्हती. एप्रिल २०२१ मध्ये मला कोविड झाला. त्यानंतर मी माझी रक्तशर्करा तपासणी केली असता ती थोडी जास्त आढळून आली. पुढे मी पतंजलीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक औषधे घेण्यास सुरुवात केली. दरम्यान रक्तशर्करा नॉर्मल होउ लागली. दोन वर्षे मी पतंजलीची औषधे घेतली परंतु माझे एचबीएवनसी ६.८ ते ७.०% च्या आसपास राहत असे.
२२ डिसेंबर २०२५ रोजी माझा स्कूटर अपघात झाला. दरम्यान माझा रक्तदाब खूप वाढला. 2D Echo Test केली व रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी अँजियोग्राफी करण्याचा सल्ला दिला. म्हणून डोक्टरांनी मला एचबीएवनसी तपासणीसाठी सांगितले. माझे एचबीएवनसी ७% असल्यामुळे त्यांनी मला Tab Metformin 500 mg ची गोळी सुरू केली. दरम्यान मी यूट्यूब वरील डॉ. दीक्षित सरांचे नाशिक येथील भाषण ऐकले, त्यात त्यांनी संपर्कासाठी श्री. नंदन देशपांडे यांचा मोबाईल नंबर सांगितला होता. मी नंदन देशपांडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मला लॉ कॉलेज रोडवरील केंद्राची माहिती दिली. मी दुसऱ्याच दिवशी ९ जून २०२६ रोजी आपल्या केंद्राला भेट दिली. तेथे मला श्री. विश्वास जोशी सर व सौ. मेघना मॅडम यांनी आहाराविषयी माहिती दिली. मी १० जून २०२६ पासून डॉ. दीक्षित जीवनशैली अंगीकारली.
मी सकाळी ११ वा. वाटीभर उकडलेले शेंगदाणे, एक वाटी काकडी व टोमॅटोचे सॅलड, एक वाटी उकडलेले/मोड आलेले मूग/मटकी/कुळीथ/हरभरा खातो. मी संध्याकाळी पाच वाजता ताक/काळा चहा घेतो. संध्याकाळी ७.१५ च्या दरम्यान मी भिजवलेले चार बदाम व चार अक्रोड खातो व त्यानंतर भाजी, पोळी/भाकरी किंवा वरण-भात खातो. मी सकाळी एक तास योगा करतो व संध्याकाळी ४ कि.मी. चालतो.
या दिनचर्येमुळे पहिल्याच महिन्यात माझे एचबीएवनसी ६.४% झाले, आणि चार महिन्यांनंतर १२/१०/२०२६ रोजी ते ५.७% झाले. याचा अर्थ चार महिन्यांत मी पूर्व-मधुमेही झालो. डॉ. दीक्षित सरांच्या सल्ल्याने मी आता सर्व औषधे घेणे बंद केले. त्यांनी मला ही जीवनशैली अशीच चालू ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
मी डॉ. दीक्षित सर, डॉ. सौ. सविता कुलकर्णी मॅडम, श्री. विश्वास जोशी सर व सौ. मेघना मॅडम यांचा खूप आभारी आहे. ही जीवनशैली पालन करण्यात माझ्या कुटुंबीयांनी मला खूप सहकार्य केले व करत आहेत. मी त्यांनाही धन्यवाद देतो.
(मराठी पुनर्लेखन: डॉ रत्नाकर गोरे)


