आजची यशोगाथा : चेतना ठोमरे

0

आजची यशोगाथा : चेतना ठोमरे

परिचय पत्र

नाव: चेतना ठोमरे
वय: ५२ वर्ष
उंची: १५५ सेंटीमीटर
व्यवसाय: गृहिणी (होमीओपॅथ)
वास्तव्य: नागपूर
समूह: DRC Nagpur
मोबाईल: ८२७५२९७३५२

मार्च २०२५ मधे केलेल्या रक्त तपासणीत माझे एचबीएवनसी १३.३% निघाले आणि मला रडूच कोसळले कारण मी २००७ पासून कार्डीओमायोपथी ह्या हृदयावरील गंभीर आजाराने ग्रस्त होती; ज्यात हृदयाची कार्यक्षमता फक्त ३० टक्के असून दिवसातून ३ वेळा पुष्कळ औषधी घ्यावी लागते. मला शारीरिक श्रमाचे काम करण्यास व पायऱ्या चढण्यास मनाई होती. जवळपास ३ महिन्यापासून मला खूप तहान व भूक लागून गोडं खाण्याची इच्छा व्हायची.
ह्याच सुमारास माझ्या मधुमेही यजमानांचे मधुमेहासाठी कुठले औषध व बाजारातील उपलब्ध विविध उपाय ह्यावर मंथन सुरु होते . सहज शक्य, नियमित करता येण्यासारखा व आर्थिक दृष्टया स्वस्त पण परिणामकारक अश्या उपायांचा शोध सुरु होता.
त्यांच्या काही मित्रांचे ह्यावरील प्रयोग व परिणाम आम्ही बघितले होते. त्यातून डॉ. जगन्नाथ दीक्षित ह्यांच्या सहजसोपे, मधुमेह मुक्ति अभियानात आम्ही सामील होण्याचे ठरविले. त्यासाठी आठवड्याभरात डॉ. दीक्षित सरांचे मधुमेह मुक्तीवरील विविध व्हिडीओ बघितले.
आम्ही उभयतांनी नागपूरच्या केंद्रावर नोंदणी केली; ज्यात माझे एचबीएवनसी दिनांक १५ एप्रिल २०२५ ला १३.३%, फास्टिंग इन्सुलिन १२.७८, वजन ६८.८ किलो व पोटाचा घेर ९५ सेंटीमीटर होता. सुरवातीला केंद्रावरील डॉक्टर माझ्या शारीरिक व्याधी व हृदयाची स्थिती बघून माझ्या ह्या जीवनशैली अवलंबनाबाबत थोड्या साशंक होत्या.
माझ्या दिवसाची सुरवात काळा चहा, त्यानंतर ताक व दुपारचे जेवण १२:३० चे सुमारास घेऊन पुन्हा दुपारी ताक, सायंकाळी काळा चहा व रात्री ८ वाजता जेवण असे दररोजचे वेळापत्रक सुरु केले. साखर, गोड पदार्थ व गोड फळे पूर्णतः बंद केली. कुठल्याही व्यायामाची व गतिशील चालण्याची मनाई असल्याने घरातील थोडं काम नियमित करीत असे.
१९ महिन्यानंतर, ७ सप्टेंबर २०२६ रोजी माझे एचबीएवनसी ५.९% झाले (७.४ ने कमी ), वजन ६३.० किलो (५.० किलोने कमी झाले) आणि कंबरेचा घेर ९१.० सेमी झाला (४.० सेमीने कमी).
मला ह्यामुळे पुष्कळ फायदा झाला जसे कपडे सैल झाले, काखेतील काळे डाग नाहीसे झाले, पायाच्या तळाव्यावरील काळेपणा नाहीसा झाला, तसेच शरीरावरील खाज कमी झाली.
जेवणात सुरवातीला शेंगदाणे/ अक्रोड/ बदाम त्यानंतर सलाद व प्रोटीनसाठी मोड आलेली कडधान्य / सोया वडी, त्यानंतर पोळी, वरण, भाजी, भात अश्या प्रकारे आहार घेतो.
माझे वजन कमी झाल्यामुळे हृदयावरील ताण कमी होऊन त्याची कार्यक्षमता ३४% पर्यंत वाढली व त्या डॉक्टरांनी औषधाची मात्रा कमी केली. डॉ. दीक्षित सरांचे व्याख्याने आम्ही नियमित बघतो व इतरांना दाखवतो. नागपूरच्या केंद्रावर नियमितपणे आयोजित केलेल्या अल्प दरातील रक्त तपासणी शिबिरात आम्ही भाग घेतो.
ह्यावर्षात मधुमेह मुक्त होऊन आनंदी जीवन जगताना ही सहज सोपी जीवनशैली नेहमीच पाळू.
डॉ. दीक्षित सरांचे मनापासून धन्यवाद व ऋणी आहोत. नागपूरच्या केंद्रावरील डॉ. शीतल साने मॅडम ह्यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच समुपदेशक सौ. मृणालिनी घाटोळ ह्यांचा सल्ला लाभला. विशेषतः, केंद्रावरील सहकारी सौ. श्वेता व श्री. अक्षय ह्यांनी हसतमुखाने मदत केली.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts