आजची यशोगाथा : सुनील वर्तक (१० ऑक्टोबर २०२६)

0

आजची यशोगाथा : सुनील वर्तक (१० ऑक्टोबर २०२६)

परिचय पत्र

नाव : सुनील वर्तक
वय : ५७ वर्ष
उंची : १६० सेंमी
वास्तव्य: मुलुंड, मुंबई
व्यवसाय: इलेक्ट्रीकल कन्सल्टंट
समूह: DM- REV 26
मोबाईल: ९३२१०४४६२३

डॉ दीक्षित जीवनशैली बद्द्ल मी साधारण २०१८ पासून परिचित होतो. त्या सुमारास वर्ष भर मी डॉ दीक्षित जीवनशैलीचे पालन केले होते. नंतर काही कारणामुळे त्यात खंड पडला.
नंतर मे २०२५ साली कंपनी च्या वार्षिक मेडिकल टेस्ट मध्ये माझी फास्टिंग शुगर 250 आणि एचबीएवनसी ११% आल्या वर मी काळजीत पडलो.
लगोलग डॉ दीक्षित सरांशी संपर्क साधला. त्यांनी धीर दिला व काहीं टेस्ट करून परत फोन करा असे सांगितले.
त्या टेस्ट चे रिपोर्ट आल्या वर सांगितल्या प्रमाणे परत डॉ दीक्षित सरांशी संपर्क साधला.

रिपोर्ट बघून सरांनी जीवनशैलीचे पालन करून सुधार होईल असा धीर दिला.
जुलाई २०२५ पासून मी फक्त दोन वेळा जेवणाचा निर्धार केला.
मी गोड पदार्थ, फळं खाणं बंद केलं.
मी रोज सूर्य नमस्कार करायला आणि अर्धा तास चालायला सुरवात केली.
पुढील चार महिन्यात खालील प्रमाणे सुधारणा झाली.
एचबीएवनसी: ११% पासून ७.०%
नंतर मला active group DM Rev 26 यामध्ये २०-०४-२०२६ मधे शामिल करण्यात आले. त्यावेळी माझे एचबीएवनसी ६.४% होते.

तिथे कविता मेहेंदळे ताईंचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले.
त्यांच्या सल्ल्याने प्रत्येक महिन्याला फास्टिंग इन्सुलिन आणि एचबीएवनसी टेस्ट करत गेलो.
एप्रिल २०२६ चे परिणाम
एचबीएवनसी ६.४%
उपाशीपोटी इन्सुलिन १०.६
मी जीवनशैली चालू ठेवली, रोज सकाळी व्यायाम, सूर्य नमस्कार, आणि जोडीला mussle strengthening exercise आणि दोन्हीं जेवणानंतर १० मिनिटे चालणे सुरूच ठेवले.

अशा प्रकारे प्रगती करत सप्टेंबर २०२६ महिन्यातले रिझल्ट्स खालीलप्रमाणे.
एचबीएवनसी ५.२%
उपाशीपोटी इन्सुलिन ९.४४

डॉ दीक्षित जीवनशैली सुरू केल्या पासून वजन ११ किलो कमी झालं.
मला दिवस भर हलकं आणि उत्साही वाटायला लागलं. माझी औषधे कमी झाली. हा डाएट प्लॅन मी असाच चालू ठेवायचे ठरवले आहे.

माझा यशाचे श्रेय मी डॉ दीक्षित आणि कविता मेहेंदळे ताईंना देतो. त्यांना आणि अभियानातील सर्वांना धन्यवाद.

(मराठी पुनर्लेखन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts