आजची यशोगाथा : सारिका हरलालका (३० सप्टेंबर २०२६)

0

आजची यशोगाथा : सारिका हरलालका (३० सप्टेंबर २०२६)

परिचय पत्र

नाव: सारिका हरलालका
वय: ५६ वर्षे
उंची: १६० सेंटीमीटर
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: गुवाहाटी
समूह: Steady Stars / DM REV 17
मोबाईल: ९८६४०६१६१६

मी ऑक्टोबर २०२५ पासून ही आहारपद्धती सुरू केली. त्यावेळी माझे एचबीएवनसी ११% होते. हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. मला औषधे घ्यायची नव्हती, त्यामुळे मी डॉ. दीक्षित जीवनशैली स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
जानेवारी २०२६ पर्यंत मी स्वतःहून ही जीवनशैली पाळत होते. त्यानंतर मी ९० दिवसांच्या चॅलेंजमध्ये सहभागी झाले.
यापूर्वी मला १० मिनिटांपेक्षा जास्त चालता येत नव्हते. परंतु पद्मा मॅडम आणि भालचंद्र सर यांच्या प्रेरणेमुळे मी दररोज १० पावले अधिक चालण्यास सुरुवात केली. हळूहळू माझी चालण्याची क्षमता वाढत गेली आणि लवकरच मी सलग ५ किलोमीटर चालू लागले.
माझे सुरुवातीचे वजन ७५ किलो होते, जे नंतर कमी होऊन ६६.५ किलो झाले. माझे एचबीएवनसी ११% वरून ७% झाले आणि पोटाचा घेर १०३ सेंटीमीटरवरून ९७ सेंटीमीटर झाला.

यासोबतच, आहाराच्या सवयींबद्दल आणि आपल्या रोजच्या आहारातील अतिरिक्त कर्बोदके कशी टाळावीत याबद्दल मला खूप ज्ञान मिळाले.
मला माझे एचबीएवनसी आणखी कमी करून मधुमेह नसलेल्या व्यक्तीच्या पातळीवर आणायचे आहे आणि ते मी लवकरच नक्की साध्य करेन, असा मला विश्वास आहे.
आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, मी जिथे कुठे जाते तिथे माझ्यात झालेले बदल पाहून माझे मित्र आणि नातेवाईक आश्चर्यचकित होतात. आता मी खूप तरुण आणि निरोगी दिसते, असे ते सांगतात. त्यानंतर मी त्यांना डॉ. दीक्षित जीवनशैलीबद्दल सांगते. अनेकांनी माझ्याकडून त्याची व्हिडिओ लिंक घेतली आहे आणि या अभियानात सहभागी होण्याची त्यांची इच्छा आहे.
या सुंदर जीवनशैलीबद्दल मी डॉ. दीक्षित यांचे आणि मला सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल पद्मा मॅडम यांचे मनःपूर्वक आभार मानते.

(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts