आजची यशोगाथा : अभिमन्यु गायकवाड
परिचय पत्र
नाव: अभिमन्यु गायकवाड
वय: ३४ वर्ष
उंची: १५६ सेंमी
वास्तव्य: शिरूर, जिल्हा पुणे
व्यवसाय: शेती
समूह: 57 DM
मोबाईल: ९०२८११३१००
मला मधुमेह, वजन वाढ, या समस्यांमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या. मला डॉ. दीक्षित जीवनशैली बद्दल यूट्यूब, सोशल मिडिया द्वारे माहिती मिळाली .
मी मेघना भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली या जीवनशैलीचे पालन सुरु केले.
मी पूर्ण शिस्त पाळली, दिवसातून दोनदाच जेवायला लागलो, व्यायाम सुरु केला आणि आहार आणि व्यायामाच्या सर्व शिस्ती पाळल्या.
मी दररोज सकाळी साधारणपणे 5 किलोमीटर चालायला सुरुवात केली त्यात डोंगर चढणे फिरणे चालु केले. दिवसभरात शेतीची छोटी मोठी कामे चालू केली व खाण्याच्या २ वेळा पाळल्या. मी सकाळी जेवणात ४ बदाम ४ ते ५ शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया,सूर्यफुलाच्या बिया,चिया सीड्स, भिजवलेले मेथीदाणे,काकडी, मोड आलेले कडधान्य ज्वारीची भाकरी आणि दिवसभरात ६ ते ७ लिटर पाणी आणि सायंकाळी पालेभाज्या सॅलड आणि ज्वारीची भाकरी असे चालू केले मी रोज सकाळी ९ व संध्याकाळी ५ या जेवणाच्या वेळा पाळल्या.
गेल्या दोन वर्षातील जीवनशैली पालनामुळे मला मिळालेले परिणाम:
एचबीएवनसी: १०.५%→ ५.५%
वजन: ९८ → ८३ किलो
कंबर: ९६.५ → ८६.५ सेंमी
इतर सुधारणा:
सुरुवातीला डॉक्टरांनी मधुमेहासाठीची साधी गोळी चालू केली होती पण थोड्या दिवसांनी मी बंद केली तसेच मला आधी खूप आळस, कामाचा निरुत्साह येत होता. आता मी माझ्या कामाची सुरुवात रोज सकाळी ५:३० वाजता उठुन करतो, त्यामूळे मला पूर्ण दिवस अगदी उत्साहात जातो आणि कामकरण्याची ऊर्जा पण वाढली आहे.
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे: आधी मला खाण्यावर कुठलेही ही नियंत्रण नव्हते. मी दिवसभरात मी कमीत कमी ४ ते ५ वेळेस खायचो. आता या जीवन शैली मुळे माझ्या खाण्यावर मला नियंत्रण मिळवता आले आहे .
या संपूर्ण प्रवासात मला डॉ दीक्षित सरांकडून सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले. मला सरांच्या प्रेरणे मुळे माझ्या वैयक्तिक जीवनात अनेक फायदे झाले. त्याबद्दल मी डॉ दीक्षित सर यांचा मनापासून आभारी आहे आणि त्याचबरोबर आमच्या समूहाच्या सगळ्या ऍडमिन विशेषतः मेघना भिडे मॅडम आणि इतर सर्व सदस्य यांनादेखील मी धन्यवाद देतो.
मी डॉ दीक्षित जीवनशैली यापुढेही चालूच ठेवणार आहे.
(मराठी पुनर्लेखन: डॉ रत्नाकर गोरे)


