आजची यशोगाथा : चंद्रशेखर भोयर
परिचय पत्र
नाव: चंद्रशेखर भोयर
वय: ४१ वर्ष
उंची: १६७ सेंटीमीटर
वास्तव्य: वरोरा, चंद्रपूर
व्यवसाय: शिक्षक
समूह: DM REV 04
मोबाइल: ९६६५७२५१६५
दिनांक २० मे २०२६ रोजी अचानक मला खूप थकवा आणि सुस्ती जाणवू लागली. ही गोष्ट मी माझ्या पत्नीला सांगितली. तिने मला, “बी.पी. आणि शुगर तपासून बघा,” असे सांगितले. त्यानुसार आम्ही माझी बी.पी. आणि रक्तातील साखर तपासली. रक्तदाब सामान्य होता; मात्र रक्तातील साखरेचे प्रमाण खूप जास्त आढळून आले.
दुसऱ्याच दिवशी आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी एचबीएवनसी तपासणी करण्यास सांगितले. माझी एचबीएवनसी ८.७% आले. त्यानंतर डॉक्टरांनी मला सकाळ-संध्याकाळ अशा दोन वेळा औषधे लिहून दिली.
माझे सोयरे डॉ. नितेश पावडे यांनी यापूर्वी डॉ. जगन्नाथ दीक्षित जीवनशैली अंगीकारली होती. त्याबद्दल माझ्या पत्नीला माहिती होती. त्यामुळे माझ्या पत्नीने मलाही ही जीवनशैली एकदा अवलंबून पाहण्याचा सल्ला दिला.
यासाठी माझ्या पत्नीने करिश्मा साळवी मॅडम यांच्याशी संपर्क साधला. मॅडमनी सुरुवातीला मला एचबीएवनसी, जेवणापूर्वीची रक्तातील साखर आणि उपाशीपोटी इन्सुलिन या तपासण्या करण्यास सांगितल्या. त्यानुसार केलेल्या तपासण्यांमध्ये माझे एचबीएवनसी ८.१%, जेवणापूर्वीची रक्तातील साखर १४५ mg/dL आणि उपाशीपोटी इन्सुलिन २०.२ असे आले.
हे रिपोर्ट मॅडमना दाखवल्यानंतर त्यांनी आम्हाला डॉ. जगन्नाथ दीक्षित जीवनशैली याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी माझ्यासाठी आहाराचे नियोजन करून दिले. त्यामध्ये दिवसातून दोनच वेळा जेवण करणे, प्रत्येक जेवण ५५ मिनिटांच्या आत पूर्ण करणे आणि दररोज एका तासात ६ किलोमीटर वेगाने चालणे यांचा समावेश होता.
मी मॅडमनी सांगितलेल्या या सर्व गोष्टी अत्यंत काटेकोरपणे पाळल्या. डॉक्टरांनी दिलेली औषधेही डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार हळूहळू कमी करत शेवटी पूर्णपणे बंद झाली. मी माझ्या आरोग्याशी संबंधित तपासण्यांचे रिपोर्ट वेळोवेळी, दर महिन्याला मॅडमना पाठवत गेलो. प्रत्येक वेळी त्यांनी माझ्या रिपोर्टनुसार मोलाचे मार्गदर्शन आणि योग्य सल्ला दिला.
या जीवनशैलीचा सातत्याने अवलंब केल्यामुळे माझ्या आरोग्यामध्ये लक्षणीय बदल झाला. आज माझी एचबीएवनसी ५.४% आणि उपाशीपोटी इन्सुलिन ०.०८ आहे. पूर्वी जाणवणारा थकवा आणि सुस्ती आता जाणवत नाही. उलट, प्रत्येक काम करण्याची ऊर्जा आणि उत्साह माझ्यामध्ये कायम जाणवतो.
डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या जीवनशैलीचा अवलंब केल्यामुळे माझ्या जीवनात सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण बदल घडून आले आहेत. माझ्यासाठी हा केवळ आहार आणि व्यायामातील बदल नसून माझ्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात झालेला एक महत्त्वाचा बदल आहे.
या संपूर्ण प्रवासात मला सातत्याने मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि मोलाचा सल्ला देणाऱ्या करिश्मा साळवी मॅडम यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. या संपूर्ण प्रवासात माझ्या पत्नीची मला खूप मोठी आणि मोलाची साथ लाभली. तिच्या प्रोत्साहनामुळे आणि सहकार्यामुळेच मला ही जीवनशैली सातत्याने पाळता आली. या प्रवासात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या माझ्या पत्नीचे आभार!
सर्वात महत्वाचे म्हणजे ही जीवनशैली समाजाला देणार्या डॉ जगन्नाथ दीक्षित याना मनःपूर्वक धन्यवाद!
(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)


