आजची यशोगाथा : सुखदेव गवळी (१२ सप्टेंबर २०२६)
परिचय पत्र
नाव: सुखदेव गवळी
वय: ४२ वर्ष
उंची: १७३ सेमी
वास्तव्य: बदलापूर, ठाणे
व्यवसाय: नोकरी
समूह: बिल्डर्स ८
मोबाईल: ९९८७१२१२८४
जवळपास दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून मला उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या समस्यांमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या. सन २०२१ मध्ये माझे वजन वाढून ते १२० किलोग्रॅम पर्यंत पोहोचले.
त्यावेळी मी सिरियसली यावर उपाय शोधू लागलो. त्याचवेळी आमच्या माई नम्रता पाटील यांच्याकडून मला डॉक्टर जगन्नाथ दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांचे आठवे वेट लॉस चॅलेंज याबद्दल माहिती मिळाली.
१ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या चॅलेंजमध्ये भाग घेण्याचा मी ठाम निर्णय घेतला. परंतु समोर असणाऱ्या होळी आणि रंगपंचमी यासारख्या सणांमुळे माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांना माझ्या सहभागातील यशस्वीतेबद्दल खात्री नव्हती. परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम होतो.
आणि त्यानुसार मी संपूर्ण कार्यक्रमाचे पूर्ण शिस्त पाळली. जेवणाचे फोटो शेअर केले. व्यायाम क्रियाकलाप अपडेट केले. प्रोग्राम मध्ये शिकवलेल्या सर्व सवयी अंगीकारल्या. मला मिळालेले ९० दिवसानंतर चे परिणाम याप्रमाणे……
एच बी ए वन सी सुरुवातीला ६.२ होते ते कमी होऊन ६.१% झाले.
उपाशी पोटी इन्सुलिन ३.५७ वरून उतरून १.७२ झाले.
सुरुवातीला वजन ८२ किलो होते ते कमी होऊन ७७ किलो झाले.
कमरेचा घेर ८९ सेमी हून कमी होऊन ८४ सेमी झाला.
याबरोबरच इतर फायदे म्हणजे माझी ऊर्जा वाढली आणि वेदना कमी झाल्या.
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे खाण्याच्या लालसेवर नियंत्रण आले, शिस्त अंगीकारण्याचा आनंद मिळाला आणि मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल झाला.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. जगन्नाथ दीक्षित सर, एडमिन श्री नितीन कुलकर्णी सर आणि पूजा पवार मॅडम यांचा मनापासून आभारी आहे.
(मराठी संकलन: आरती मोने)


