आजची यशोगाथा : गोपाळ दगडे (१० सप्टेंबर २०२६)

0

आजची यशोगाथा : गोपाळ दगडे (१० सप्टेंबर २०२६)

परिचय पत्र

नाव: गोपाळ दगडे
वय: ७४ वर्षे
उंची: १५६ सेमी
वास्तव्य: पिंपरी चिंचवड
व्यवसाय: निवृत्त व्यवस्थापक, खाजगी कंपनी
समूह: DRC पुणे
मोबाईल: ९७६३१६४५४२

डॉ दीक्षित जीवनशैली बद्दलची माहिती माझ्या संपर्कातील मित्रांकडून मिळाली व मनात एक उत्सुकता निर्माण झाली. आपणही हे नक्की काय आहे त्यासाठी मी मोबाईल वरून त्याविषयी अनेक व्हिडिओ डॉ दीक्षित जीवनशैली बद्दल पाहून संपर्क नंबर मिळविला व एक दिवस पुणे सेंटरला श्री विश्वास जोशी यांच्याशी संपर्क साधला. मला माझे वजन व मधुमेह बद्दल जाणून घ्यायचे आहे असे सांगितल्यावर त्यांनी तुम्ही एचबीएवनसी व उपाशीपोटी इन्सुलिन करून या असे सांगितले.

दिनांक २६ जुलै २०२५ रोजी माझा रिपोर्ट पाहिल्यानंतर मी पूर्वमधुमेही असल्याचे सांगितले आणि त्यानंतर मी खूप अस्वस्थ झालो पण जोशी सरांनी मला धीर देत डॉ दीक्षित जीवनशैली बद्दलची संपूर्ण माहिती दिली. माझे एचबीएवनसी ६.२% व उपाशीपोटी इन्सुलिन १०.१८ असे होते.वजन ६५.४ किलो, कंबरेचा घेर १०१ सेमी व हिप १००सेमी असे होते.

जोशी सरांनी सांगितल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवसापासूनच संपूर्ण डाएट प्लॅन सुरू केले. ४५ मिनिटात ४.५ किमी चालणे, दिवसातून कडक भुकेची वेळ समजून दोन वेळा क्रमशः ( सर्वात अगोदर ४ भिजवलेले बदाम व ४आक्रोड) किंवा अर्धा मूठ शेंगदाणे नंतर एक काकडी व एक टोमॅटो सॅलड आणि त्यानंतर मोड आलेली कडधान्ये (मूग,मटकी, हरभरे) व त्यानंतर घरी बनविलेले जेवण, दोन जेवणाच्या मध्ये पाणी व पातळ ताक घेऊ लागलो. साखर व गोड पदार्थ पूर्ण वर्ज केले. सुरुवातीला खूप कठीण व सवय नसल्याने काहीतरी खायची इच्छा व्हायची परंतु ते सर्व टाळले.
त्याचा परिणाम म्हणजे फक्त दोन महिन्यात म्हणजे १० ऑक्टोबर २०२५ रोजी मी मधुमेह मुक्त झालो. माझे एचबीएवनसी ५.६% व उपाशीपोटी इन्सुलिन ४.८७ , वजन ६१.३५ किलो, कंबरेचा घेर ९४ सेमी व हिप घेर 93९३ सेमी झाला. त्यानंतर मी अगदी नियमितपणे डाएट पालन करीत आहे व भविष्यातही असाच चालू ठेवणार व इतरांनाही मार्गदर्शन करणार आहे.दिनांक १० नोव्हेंबर २०२५ माझे वजन ६०.१० किलो, कंबरेचा घेर ९० सेमी झाला. डॉ दीक्षित सरांनी माझे विशेष अभिनंदन करून पुढील निरोगी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या व एक T shirt व पुस्तक देऊन सत्कार केला.

डॉ दीक्षित जीवनशैली मुळे माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. पूर्वी मला ऍसिडिटीचा व अपचनाचा खूप त्रास होता.तो पूर्णपणे नाहीसा झाला. शरीर हलके वाटू लागले आहे व झोपही खूप शांत लागते.माझी स्मरणशक्तीही वाढली असुन मन प्रसन्न वाटते. चालताना थोडीशी धाप लागत असे पण आता मी सलग तासभर चालू शकतो.
या सर्व डाएट पालन करत असताना सेंटरमधील सहकारी व डॉ दीक्षित सरांचे खूप मदत झाली. यामध्ये माझ्या पत्नीचेही खूप सहकार्य मिळाले म्हणूनच मला शक्य झाले. सर्वांचे मनःपूर्वक आभार.

(मराठी पुनर्लेखन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts