आजची यशोगाथा : शीतल भुरे (२ सप्टेंबर २०२६)
परिचय पत्र
नाव: शीतल भुरे
वय: ४० वर्ष
उंची: १५२ सेमी
व्यवसाय: शिक्षिका
वास्तव्य: पुणे
समूह: अचिव्हर्स
मोबाईल: ९०६७६७६७२८
२०२३ मध्ये अचानक माझ्या लक्षात आलं की माझं वजन खूप वाढलं आहे आणि चक्क ८२ किलो पर्यंत पोहोचलं आहे. त्याच वेळेला मला उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही विकारांशी सामना करण्याची वेळ आली.
ज्यावेळी मी डॉक्टरांकडे गेले त्यावेळेला त्यांनी मला काही गोळ्या लिहून दिल्या परंतु यासाठी गोळ्या घेणं मला स्वतःला मान्य नव्हतं.
त्या वेळेला माझ्या पतींनी मला डॉक्टर दीक्षित जीवनशैली बद्दल माहिती दिली आणि मी डॉक्टर दीक्षित सेंटरवर जाऊन एडमिनना भेटले.
त्यानंतर मी सहाव्या वेट लॉस चॅलेंजमध्ये भाग घेतला.
परिणाम असा झाला…
माझं वजन ८२ किलो होऊन कमी होऊन ७० किलो झालं.
एच बी ए वन सी ८.८ वरून उतरून ५.९% झालं.
अशाप्रकारे मी मधुमेही पासून पूर्व मधुमेही बनले.
यामुळे माझा आत्मविश्वास वाढला परंतु मला हवा तसा परिणाम मिळणं अजून शिल्लक होतं आणि म्हणून मी आठव्या वेट लॉस चॅलेंज मध्ये भाग घेतला.
यावेळी मी रोज एक तासात पाच किलोमीटर चालत असे.
फक्त दोन वेळा जेवण करणे हे तर मला पाळता आलं पण घरातल्या काही अडचणींमुळे माझं चालणं नियमितपणे झालं नाही.
अशा परिस्थितीत सुद्धा मला जे परिणाम मिळाले ते याप्रमाणे…
सुरुवातीचं ७० किलो वजन कमी होऊन ६७ किलो झालं.
कमरेचा घेर १०३ सेमी वरून कमी होऊन १०० सेमी झाला.
एच बी ए वन सी ५.८ वरून ६% झालं.
उपाशी पोटी चे इन्सुलिन १०.५ वरून कमी होऊन ८.७४ झालं.
या पूर्ण प्रवासामध्ये डॉक्टर दीक्षित सर, एडमिन श्रीकांत डंके सर आणि अंजली मॅडम यांनी मला खूप मदतही केली आणि मार्गदर्शन पण दिलं. त्यांच्यामुळे माझ्या जीवनशैलीमध्ये चांगल्या प्रकारचे बदल घडले आणि मी सकारात्मक झाले.
मी ठरवलं आहे की डॉक्टर दीक्षित जीवनशैलीचे पालन मी आयुष्यभर करणार आहे.
(मराठी संकलन: आरती मोने)


