आजची यशोगाथा : रोहन पागे (२६ ऑगस्ट २०२६)

0

आजची यशोगाथा : रोहन पागे (२६ ऑगस्ट २०२६)

परिचय पत्र

नाव: रोहन पागे
वय: ३८ वर्षे
उंची: १६४ से.मी.
वास्तव्य: पुणे, महाराष्ट्र
व्यवसाय: व्यवस्थापक, व्हिज्युअल डिझाइन
समूह: अचिव्हर्स
मोबाईल: ८२७५५१५७०२

चॅलेंजपूर्वी:

दिनांक: १६/०१/२०२६
वजन: ८७.६५ कि.ग्रॅ.
एचबीए१सी: ४.८ %
फास्टिंग इन्सुलिन: १५.० आय.यू./एम.एल.

चॅलेंजनंतर:

दिनांक: २५/०४/२०२६
वजन: ८२.६ कि.ग्रॅ.
एचबीए१सी: ४.६ %
फास्टिंग इन्सुलिन: १०.८ आय.यू./एम.एल.

मी फेब्रुवारी महिन्यात या चॅलेंजमध्ये सहभागी झालो असलो, तरी माझा प्रवास सप्टेंबर महिन्यापासून सुरू झाला होता. त्या वेळी माझे वजन ९०.५ कि.ग्रॅ. होते. आठवड्याच्या शेवटी मी साधारणतः ७ कि.मी. चालत होतो आणि नियमितपणे व्यायामशाळेत जात होतो. जानेवारी महिन्यात माझा मित्र ध्रुव साळवी याने मला डॉ. दीक्षित यांच्या ९० दिवसांच्या वजन कमी करण्याच्या चॅलेंजबद्दल माहिती दिली.

चॅलेंज सुरू करताना माझे वजन ८७.६५ कि.ग्रॅ. होते. त्यानंतर मला दिलेल्या जेवणाच्या नियमांचे सातत्याने पालन केले. दिवसातून फक्त दोन वेळा जेवण — आधी सुकामेवा, कोशिंबीर, मोड आलेले कडधान्ये शेवटी पोळी-भाजी — या पद्धतीमुळे माझ्या खाण्याच्या इच्छा मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आल्या. पूर्वी दिवसातून अनेक वेळा खाण्याची सवय असल्यामुळे नेहमी जड आणि भरल्यासारखे वाटत असे; मात्र आता शरीर हलके आणि ऊर्जावान वाटू लागले.

चॅलेंजच्या पहिल्याच महिन्यात माझे वजन ८५.३० कि.ग्रॅ. पर्यंत कमी झाले. या संपूर्ण प्रवासात मी जवळपास ८० दिवस दररोज ६ कि.मी. चालणे अथवा सायकलिंग केले. हे सातत्य माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.

यासोबतच, जेवण सुंदर पद्धतीने सजवण्याचा मला विशेष आनंद मिळाला. कीर्ती लांडे मॅडम यांनी पाठवलेल्या जेवणाच्या थाळीच्या छायाचित्रामुळे मला खूप प्रेरणा मिळाली आणि ही सवय अधिक उत्साहाने जोपासता आली.
माझे मित्र ध्रुव साळवी, विरेन रासने आणि माझे सासरे रविकांत गोसावी (वय ७१ वर्षे) यांच्यासोबत चालण्यामुळे मला सातत्याने प्रेरणा मिळत राहिली.
आज माझे वजन ८२.६ कि.ग्रॅ. आहे आणि या प्रवासात मी एकूण जवळपास ८ कि.ग्रॅ. वजन कमी केले आहे. पुढील लक्ष्य ७० कि.ग्रॅ. गाठण्याचे असून, ही जीवनशैली पुढेही कायम ठेवण्याचा माझा दृढ निर्धार आहे.
ही पद्धत कठोर नसल्यामुळे ती दीर्घकाळ सहजपणे पाळता येते आणि खाण्याचा आनंददेखील कायम राहतो. म्हणूनच मी सर्वांना ही जीवनशैली स्वीकारण्याची मनापासून शिफारस करतो.
डॉ. दीक्षित तसेच गटप्रमुख श्री. डंके सर, श्री. बोडस सर आणि अंजली पाठक मॅडम यांचे मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक आभार.

तसेच, माझे मित्र ध्रुव साळवी आणि विरेन रासने यांचे या प्रवासात दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल विशेष धन्यवाद.

(मराठी संकलन: डॉ. रूपाली अतुल बोंद्रे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts