आजची यशोगाथा : आरती मंगसुळे
परिचय पत्र
नाव: आरती मंगसुळे
वय: ३० वर्ष
उंची: १५५ सेमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: पुणे
समूह: अचीव्हर्स
मोबाईल: ९८६०२६३२२५
सहज म्हणून केलेल्या रुटीन चेकअप मधून जेव्हा लक्षात आलं की मी पूर्व मधुमेही आहे,त्यावेळी मी पार कोलमडून गेले. यासाठी कोणत्याही प्रकारची औषधे घेण्याची माझी इच्छा नव्हती आणि म्हणून मी इतर उपायांचा शोध घ्यायला लागले. डॉ. दीक्षित यांचे बरेच व्हिडिओज माझ्या पाहण्यात आले ज्या मधून मधुमेह हा पुन्हा माघारी पाठवता येतो हे समजलं. आणि हीच जीवनशैली अंगीकारण्याचा मी निश्चय केला. डिसेंबर २५ मध्ये मी आठव्या चॅलेंजमध्ये भाग घेतला.
पहिले पंधरा दिवस माझ्यासाठी अतिशय अवघड होते कारण या नवीन जीवनशैली सोबत सूर मिळवणे मला तितकेसे जमत नव्हते. परंतु आमच्या ग्रुपच्या एडमिननी माझ्या रोजच्या व्यवहारातील प्रत्येक बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिले आणि मला माझ्या जेवणामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या समजावून सांगितल्या. त्यामुळे किती अन्न खायचे, अन्न खाताना पदार्थांचा क्रम कसा असावा हे सर्व मला नीट समजले. याची घडी नीट बसल्यानंतर मग मी रोज साडेचार किलोमीटर चालणे सुरू केले ज्याचा मला खूपच फायदा झाला.
९० दिवसानंतर मला मिळालेले परिणाम अशा प्रकारे ….
एच बी ए वन सी ५.८ वरून कमी होऊन ५.२% झाले.
सुरुवातीचे ७५ किलो वजन ६६ किलोपर्यंत उतरले.
उपाशीपोटी इन्सुलिन ८.४ वरून ६.१५ झाले.
कमरेचा घेर ९२ सेमीवरून ८१ सेमी इतका कमी झाला.
या सर्व प्रवासात मला डॉ. दीक्षित सर, अंजली मॅडम, बोडस सर आणि डंके सर यांचे मार्गदर्शन मिळाले.
या चॅलेंजमध्ये भाग घेतल्यामुळे माझ्या आयुष्यातल्या संपूर्ण गोंधळावर मला नियंत्रण मिळवता आले. अनावश्यक धडपड न करता आत्मविश्वास मिळाला आणि सातत्य राखल्यामुळे अपेक्षित परिणाम हा मिळतोच हे समजलं. फक्त वजन कमी झाले असं नाही तर आरोग्यपूर्ण जीवनशैली मिळाली.
या सर्वांसाठी अडोर ट्रस्ट आणि सर्व ऍडमिन्सची मी मनापासून आभारी आहे.
(मराठी संकलन: आरती मोने)


