आजची यशोगाथा : संदीप लासूरकर

0

आजची यशोगाथा : संदीप लासूरकर

परिचय पत्र

नाव: संदीप लासूरकर
उंची: 163 cm
वय: 49 वर्षे
वास्तव्य: छत्रपती संभाजीनगर
व्यवसाय: नौकरी मार्केटिंग
समूह: गार्डियन
मोबाईल: 9370238981

मी 2014 पासून वाढते वजन, गुडघेदुखी, मधुमेह मुळे ञस्त होतो. विविध डायट प्लॅन करून ही काहीच फायदा होत नव्हता. या समस्यांमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या.
टेलिग्राम वरील Dr Dixit Lifestyle : Weightloss या ग्रुप मधून 90 days challenge बद्दल माहिती मिळाली.
हे चॅलेंज 1.2.2026 पासून सुरू होणार असल्याचे कळले.
एप्रिल 2017 मध्ये डॉ दीक्षित सरांचे व्याख्यान ऐकले होते. आणि बरेच दिवस डॉ दीक्षित lifestyle follow केली होती. त्याचा मला फायदा ही झाला होता. म्हणुन या 90 days challenge मध्ये सहभागी होण्याचे मनापासुन ठरवले. ग्रुप वरील सूचनेनुसार मी Hba1c व fasting insulin टेस्ट रिपोर्ट सबमीट केले. Challenge च्या सुरवातीचे report असे होते.
Hba1c- 6.9, fasting insulin 36.30, weight 83 kg, waist perimeter 119cm.
त्यानंतर ग्रुप Admin श्रीनिवास बोलबत्तीन सर व निखिल नाफडे सरांनी मला गार्डियन ग्रुप मध्ये सामील करून घेतले. अशा रीतीने 1 फेब्रुवारी 2026 पासून Weightloss and diabetes reversal साठी माझा प्रवास सुरू झाला. रोज किमान 5 km चालणे, जेवणाचे फोटो शेअर करणे, सांगितल्या क्रमाने पदार्थ खाणे, weekly activity मध्ये सहभाग या सर्वांमुळे रोजच्या जीवनात एक नवीन शिस्त निर्माण झाली.
पहिल्या महिन्यात माझे वजन 1.70 kg ने कमी झाले व कमरेचा घेर 4 सें.मी. कमी झाला.
पुढील (2) महिन्यांमध्ये अजून लक्षणीय व सकारात्मक बदल दिसला. माझे वजन 1.80 kg अजून कमी झाले व Hba1c सुद्धा 0.4% ने कमी झाले. या बदलामुळे मला उत्साही वाटू लागले.

90 दिवसांनंतरचे अंतिम निकाल:
HbA1c: सुरवातीचे 6.90→ शेवटचे 5.80
वजन: सुरुवातीचे → 83kg शेवटचे- 78.50 kg
कंबर: सुरुवातीची 119 cm → शेवटची – 114cm.
फास्टिंग इंसुलिन, :सुरुवातीची 36.30 → शेवटची 8.70

वजन कमी झाल्यामुळे गुडघेदुखी व पाठदुखी मध्ये बराच आराम मिळाला.

या challenge मध्ये भाग घेतल्या मुळे मनाला एक नवी उभारी मिळाली की आपण खाण्याच्या लालसेवर नियंत्रण मिळवू शकतो व ही शिस्त बद्ध जिवन पद्धती आयुष्य भर अवलंब करू शकतो.

या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित सर, ग्रुप ॲडमीन श्रीनिवास बोलबत्तीन सर व निखिल नाफडे सर, मेघना भिडे मॅडम यांचा मनापासून आभारी आहे.

(मराठी संकलन: रविंद्र ढवळीकर)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts