आजचा प्रश्न

0

आजचा प्रश्न

जेवण हळूहळू वा भरभर केल्याने काय होते

एक घास बत्तीस वेळा चावून खाल्याने तोंडापासून पूर्ण पचनसंस्थेत पाचक रस चांगल्या प्रकारे पाझरतात व पचनक्रिया चांगल्या प्रकारे होते.
घाईघाईने जेवल्यास पाचकरस योग्य प्रकारे निर्माण न झाल्याने अन्नपचन योग्य प्रकारे होत नाही.

दुसरे म्हणजे हळूहळू जेवणारे लोक सामान्यतः भरभर जेवणाऱ्यांचा तुलनेत कमी खातात असे दिसून येते. साहजिकच हळूहळू जेवणाऱ्यांच्या पोटात कमी अन्न जाते.

या बाबतीत एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी .आपण पहिला घास घेतल्यानंतर तासाभरात शरीरातील इन्सुलिनची पातळी उच्चतम मर्यादेवर पाहोचते.नंतर तासाभरात ती पातळी पूर्वपदावर येते.
म्हणून आपले जेवण 55 मिनिटांत अाटपायाला हवे.
त्यापेक्षा जास्त काळ जेवल्यास इन्सुलिन पुन्हा निर्माण होते. म्हणून कितीही हळू जेवले तरी जेवण 55 मिनिटांत संपवावे

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts