आजची यशोगाथा : वेदिका चव्हाण (६ जुलै २०२६)

0

आजची यशोगाथा : वेदिका चव्हाण (६ जुलै २०२६)

परिचय पत्र

नाव: वेदिका चव्हाण
उंची: १५१ सेंमी
वय: ३७ वर्ष
वास्तव्य: विरार
व्यवसाय: व्यवसाय
समूह: बिल्डर्स
मोबाईल:  ८१६९७५५८५८

मला cholesterol आणि मधुमेह या समस्यांमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या. मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांचे चॅलेंज बद्दल माहिती यूट्यूब द्वारे मिळाली  .
हे चॅलेंज ०१/०२/२०२६ पासून सुरू होणार असल्याचे कळल्यावर मी ठाम निर्णय घेतला. गुढीपाडवा, होळी सारख्या सणांमुळे कुटुंबीय आणि मित्रांना खात्री नव्हती पण मी पूर्ण मनाने हे चॅलेंज करण्याचे ठरवले.
मी पूर्ण शिस्त पाळली. जेवणाचे फोटो शेअर केले. व्यायाम/क्रियाकलाप अपडेट केले. प्रोग्राममध्ये शिकवलेल्या सवयी अंगीकारल्या.
पहिल्या महिन्यात मला वजन कमी, साखरेचे प्रमाण कमी असा बदल दिसला.
पुढील महिन्यांमध्ये अजून प्रगती झाली जसे की वजन कमी, चांगले ब्लड रिपोर्ट्स, जीवनशैलीत बदल.

९० दिवसांनंतरचे अंतिम निकाल:

एचबीएवनसी: [सुरुवातीचे] ८.१% → [शेवटचे] ६.६%

वजन:  [सुरुवातीचे] ७२ किलो→ [शेवटचे] ६० किलो

कंबर: [सुरुवातीची] १०७ सेंमी→ [शेवटची] ९६ सेंमी

इतर सुधारणा: उर्जा वाढली, मासिक पाळीचा त्रास कमी झाला

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे खाण्याच्या लालसेवर नियंत्रण, शिस्त अंगीकारणे, मनोवृत्ती सुधारली

हा प्रवास माझ्यासाठी कठीण होता. नितीन सर यांनी चालण्यासाठी खूप प्रोत्साहित केले सुरवातीला मी ४-५ किमी. चालत असे आता मी १०-१२ किमी. चालते. संपूर्ण  प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित आणि आमचे एडमिन नितीन कुलकर्णी सर अणि पूजा पवार मॅडम यांची मनापासून आभारी आहे. मी पुढेही ही जीवनशैली कायम ठेवणार आहे.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts