आजची यशोगाथा : कीर्ती झंवर ( २४ जून २०२६ )
परिचय पत्र
नाव: कीर्ती झंवर
वय: ५० वर्षे
उंची: १६२ सेमी
वास्तव्य: परळी वैजनाथ
व्यवसाय: गृहिणी
समूह: गार्डियन
मोबाईल: ९४०४६५५२६०
मधुमेहामुळे मला दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या. मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांच्या चॅलेंजची माहिती DRCC ग्रुपमधून मिळाली. जेव्हा मला समजले की हे चॅलेंज १ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहे, तेव्हा मी त्यामध्ये नक्की सहभागी होण्याचा दृढ निश्चय केला. महाशिवरात्री, गणगौर, गुढीपाडवा यांसारखे सण-उत्सव असल्यामुळे माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रांना माझ्यावर विश्वास नव्हता; परंतु मी संपूर्ण समर्पणाने हे चॅलेंज पूर्ण करायचे ठरवले होते.
मी संपूर्ण शिस्तीचे पालन केले. माझ्या आहाराचे फोटो नियमितपणे शेअर केले, व्यायाम व इतर उपक्रमांची माहिती दिली आणि कार्यक्रमात सांगितलेली जीवनशैली प्रामाणिकपणे अंगीकारली.
९० दिवस पूर्ण झाल्यानंतरचे अंतिम परिणाम:
एचबीए१सी: ८% → ६.४%
वजन: ५८ किलो → ५६ किलो
कंबर: ८४ सेमी → ८३ सेमी
इतर सुधारणा: औषधे कमी होणे, ऊर्जा वाढणे
वैयक्तिक अनुभव: खाण्यावरील लालसेवर नियंत्रण, शिस्तीची सवय लागणे, मानसिकतेत सकारात्मक बदल इत्यादी
तिसऱ्या महिन्यात माझा प्रवासाचा कार्यक्रम ठरला होता. त्यामुळे १० ते १२ दिवस जीवनशैलीचे योग्य प्रकारे पालन करता आले नाही. मात्र प्रवासावरून परत आल्यानंतर मी पुन्हा जीवनशैलीच्या पालनावर लक्ष केंद्रित केले. अखेरीस माझे एचबीए१सी ६.४% पर्यंत आले असून मला खूप आनंद होत आहे.
या संपूर्ण प्रवासात मार्गदर्शन आणि सहकार्य दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित, तसेच ॲडमिन श्रीनिवास सर आणि नाफडे सर यांचे मनःपूर्वक आभार मानते.
(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)


