आजची यशोगाथा : सारंग घोंगे ( २२ जून २०२६ )
परिचय पत्र
नाव: सारंग घोंगे
वय: ३८ वर्षे
उंची: १५९ सेंमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: आयटी अभियंता
समूह: वॉरियर ग्रुप
मोबाईल: ९०९६७४६५२२
गेल्या २–३ वर्षांपासून मी मधुमेह आणि वाढलेल्या वजनाच्या समस्येशी झुंज देत होतो. याचा माझ्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत होता. सतत थकवा जाणवत असे, भविष्यातील आरोग्याबाबत चिंता वाटत असे आणि साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांवर अवलंबून राहावे लागत होते. ही परिस्थिती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप त्रासदायक होती. अशाच काळात मला DRCC समूहामार्फत डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांच्या चॅलेंजबद्दल माहिती मिळाली. यामुळे नैसर्गिक पद्धतीने माझी प्रकृती सुधारू शकते, अशी आशा निर्माण झाली.
चॅलेंजबद्दल माहिती मिळाल्यानंतर मी पूर्ण निष्ठेने यात सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे माझी पत्नी होती. तिनेही माझ्यासोबत या चॅलेंजमध्ये नाव नोंदवले. आम्ही दोघांनी एकमेकांना सतत साथ दिली, शिस्त पाळली आणि कठीण प्रसंगांमध्ये परस्परांना प्रोत्साहन दिले. आज आम्ही दोघेही मिळालेल्या परिणामांमुळे अत्यंत आनंदी आणि समाधानी आहोत.
संपूर्ण चॅलेंजदरम्यान मी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितलेल्या तत्त्वांचे प्रामाणिकपणे पालन केले. आहारामध्ये शिस्त राखली, नियमितपणे माझी प्रगती समूहात शेअर केली आणि समूहाशी सतत जोडलेलो राहिलो. पहिल्याच महिन्यात उत्साहवर्धक परिणाम दिसू लागले. माझे वजन कमी होऊ लागले आणि रक्तातील साखरेची पातळीही सुधारू लागली. यामुळे सातत्य राखण्याची आणि अधिक लक्षपूर्वक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली.
पुढील महिन्यांमध्ये हा बदल अधिक स्पष्टपणे जाणवू लागला. माझी ऊर्जा लक्षणीयरीत्या वाढली, मी अधिक सक्रिय आणि सकारात्मक झालो तसेच औषधांवरील माझे अवलंबित्वही बऱ्याच प्रमाणात कमी झाले. या संपूर्ण प्रवासात समूहाच्या प्रशासिका कविता मेहेंदळे आणि मीनल मॅडम यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रोत्साहन मला प्रेरित ठेवण्यात अत्यंत महत्त्वाचे ठरले.
(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)


