आजची यशोगाथा : सोनाली साहू ( २० जून २०२६ )

0

आजची यशोगाथा : सोनाली साहू ( २० जून २०२६ )

परिचय पत्र

नाव: सोनाली साहू
वय: ३७ वर्ष
उंची: १५२ सेमी
व्यवसाय: डॉक्टर
वास्तव्य: बुरला, संबलपुर, ओडिशा
समूह: स्टेडी स्टार्स
मोबाईल : ९७७७८०८८३२

वयाच्या ३७ व्या वर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मला उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाचा त्रास होता, तसेच मी ‘प्री-डायबिटीज’च्या श्रेणीतही येत होते. वजन कमी करण्यासाठी मी अनेक पद्धतींचा अवलंब केला होता, पण त्यात मला यश येत नव्हते. माझ्या बहिणीकडून मला डॉ. दीक्षित सरांबद्दल माहिती मिळाली. आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉ. दीक्षित सरांचे व्याख्यान ऐकल्यानंतर मला खूप प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी या ९० दिवसांच्या चॅलेंज मध्ये सहभागी झाले आणि या ३ महिन्यांच्या ‘चॅलेंज’ दरम्यान माझे वजन ८.५ किलोने कमी झाले (८८.५ किलोवरून ८० किलोपर्यंत); तसेच माझी एचबीएवनसी पातळी, जी आधी ६ होती, ती ५.७ पर्यंत खाली आली. माझ्या कमरेचा घेर १०८ सेमी होता, जो या चॅलेंजच्या शेवटी १०० सेमीपर्यंत कमी झाला.
मी ३ महिने सातत्याने डॉ. दीक्षित लाइफस्टाइलनुसार आहार आणि व्यायामाचे पालन केले. मी पहाटे ४ वाजता उठायचे आणि ४:३० वाजता मॉर्निंग वॉकला जायचे. मी सलग किमान ४५ मिनिटे चालायचे. मी दिवसातून दोनदा जेवण्याच्या पद्धतीचे काटेकोरपणे पालन केले. मी माझ्या जेवणाच्या ताटांची सुंदर सजावट करायचे आणि ती ग्रुपवर शेअर करायचे, ज्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळाली. मी ‘सर्वोत्तम सजवलेले ताट’ ही स्पर्धाही जिंकले. तसेच बटाटे सोलण्याच्या स्पर्धेतही मला प्रथम क्रमांक मिळाला. मी दर आठवड्याला होणाऱ्या आणि शनिवार-रविवारी होणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये पूर्ण उत्साहाने सहभागी व्हायचे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी डॉ. दीक्षित सर आणि इतरांचे व्हिडिओही मी पाहायचे, जे खूप प्रेरणादायी असायचे.

आता मला अधिक हलके, सशक्त आणि आत्मविश्वासपूर्ण वाटते. माझी शारीरिक क्षमता (स्टॅमिना) वाढली आहे. पूर्वी मला ॲसिडिटीचा त्रास व्हायचा, पण या ३ महिन्यांत मला एकदाही ॲसिडिटीचा त्रास झाला नाही. खाण्याच्या तीव्र इच्छांवरही माझे चांगले नियंत्रण आले आहे.
मी डॉ. दीक्षित सर आणि माझे ग्रुप ॲडमिन्स – सौ. पद्मा मॅडम व श्री. भालचंद्र सर – यांचे मनापासून आभार मानते; त्यांनी या संपूर्ण प्रवासात मला सतत मार्गदर्शन केले, आधार दिला आणि माझ्या प्रगतीवर लक्ष ठेवले. त्यांनी नेहमीच माझा उत्साह वाढवण्याचे काम केले. या चॅलेंजचा भाग झाल्याचा मला खूप आनंद आहे, कारण यामुळे माझ्या आरोग्यात सकारात्मक बदल झाले आहेत.
मी ही जीवनशैली नक्कीच कायमस्वरूपी पाळेन आणि निरोगी व आनंदी राहीन.

(मराठी संकलन: मीनल ड़ोणगाँवकर)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts