आजची यशोगाथा : ऋचा बोडस ( ४ जून २०२६ )

0

आजची यशोगाथा : ऋचा बोडस ( ४ जून २०२६ )

परिचय पत्र

नाव: ऋचा बोडस
वय: ५४ वर्ष
ऊंची: १५६ सेमी
व्यवसाय: स्वयंरोजगार
वास्तव्य: पुणे
समूह: Warriors 8th Challenge
मोबाईल: ९८२२६४५३०५

मला मधुमेह तसेच वाढलेल्या वजनाचा खूप त्रास जाणवत होता. साधारणपणे २००९ च्या सुमारास मला मधुमेह असल्याचे निदान झाले. त्यानंतर विविध औषधे आणि गोळ्या सुरू होत्या आणि कालांतराने त्यांचे प्रमाणही वाढत गेले.
कोरोनाच्या आधी मी अर्धवट माहितीच्या आधारे डॉ दीक्षित जीवनशैली सुरू केली होती. योग्य मार्गदर्शन न घेतल्यामुळे त्या वेळी थोडाफार फायदा झाला, पण काही कारणांमुळे मला ती जीवनशैली सोडावी लागली.
घरात या विषयावर नेहमी चर्चा व्हायची. आमचे मित्र अनिरुद्ध देशपांडे, मुंबई यांनी पुन्हा सेंटरला भेट देऊन जीवनशैली योग्य पद्धतीने सुरू करण्याचा आग्रह केला. “ही जीवनशैली पुन्हा अंगीकारली तर मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो, किंबहुना औषधेही कमी होऊ शकतात,” हा विश्वास त्यांच्या बोलण्यातून मला मिळाला आणि मी सेंटरला भेट देण्याचा निर्णय घेतला.
३ सप्टेंबर २०२५ रोजी मी टेस्ट केल्या. त्यामध्ये माझे एचबीएवनसी ७.७% आणि उपाशीपोटी इंसुलिन २४ होते. तसेच माझे वजनही नव्वदीच्या घरात पोहोचले होते. रिपोर्ट घेऊन मी सेंटरला गेले. तिथे शिल्पा ताई आणि डॉ दीक्षित सरांनी मला योग्य मार्गदर्शन केले. “जीवनशैली नीटपणे आणि नियमित पाळली तर तुम्ही मधुमेहमुक्त होऊ शकता,” हा आत्मविश्वास त्यांनी दिला.
मी ४ सप्टेंबर २०२५ पासून डॉ दीक्षित जीवनशैली सुरू केली. सुरुवातीच्या चार महिन्यांतच मला वजन आणि शरीराच्या मापांमध्ये चांगली घट दिसून आली. नियमित व्यायाम, सांगितलेल्या क्रमानुसार दिवसातून दोन वेळा भोजन आणि शिस्तबद्ध दिनक्रम यामुळे माझ्या शरीरात सकारात्मक बदल जाणवू लागले.
डिसेंबरमध्ये केलेल्या तपासणीत माझे एचबीएवनसी ७% आणि उपाशीपोटी इंसुलिन ७.५० झाले. तसेच माझे वजन ८९.९० वरून ८१.६० किलोपर्यंत खाली आले. डॉक्टरांना भेटल्यावर त्यांनी माझ्या औषधांचा डोसही कमी केला.
यानंतर आमच्या ग्रुपमधून मला 8th Challenge बद्दल माहिती मिळाली आणि मी त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. जानेवारी महिन्यात दुखापत झाल्यामुळे मला व्यायामावर काही निर्बंध आले होते, त्यामुळे Challenge मध्ये सहभागी व्हावे की नाही, अशी शंका मनात होती. पण मी हार मानली नाही.

काही दिवस चालण्याचा व्यायाम करता आला नाही, तरी मी भोजनाचे नियम अतिशय काटेकोरपणे पाळले. जेवणाचे फोटो नियमित शेअर केले तसेच व्यायामाच्या अपडेटसाठी Google Form भरत राहिले. कविता ताई आणि मीनल ताई यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरले. त्याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे.
या Challenge मुळे आणि डॉ दीक्षित जीवनशैलीमुळे मला गोड खाण्याच्या लालसेवर विजय मिळवता आला. ही जीवनशैली अंगीकारणे सोपे आणि व्यवहार्य असल्यामुळे मी ती उर्वरित आयुष्यातही कायम पाळण्याचा निर्धार केला आहे.
माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला मी ही जीवनशैली अवश्य सांगणार आहे आणि डॉ दीक्षित यांनी सुरू केलेल्या या आरोग्य अभियानात माझाही खारीचा वाटा उचलण्याचा नक्की प्रयत्न करेन.
मी डॉ दीक्षित,कविता मेहेंदळे आणि मीनल डोणगावकर यांचे मनापासून आभार मानते.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts