आजची यशोगाथा : विजय बोऱ्हाडे
परिचय पत्र
नाव: विजय बोऱ्हाडे
वय: ५७ वर्षे
उंची: १६५ से. मी.
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: राजगुरुनगर
समूह: डी एम एम ग्रुप २, एल सी रोड,पुणे
मोबाईल: ९८८१२९४८८४
मी राजगुरुनगर सहकारी बँक येथे काम करतो. माझे वय ५७ वर्षे आहे. २०१३ रोजी अपघात झाल्याने , ऑपरेशन करण्यासाठी केलेल्या रक्त तपासणीत पहिल्या टप्प्यात डायबेटीस असल्याचे समजले. सुरवातीला मी गांभीर्याने विचार केला नाही परंतु २०२१-२२ मध्ये हाताच्या बोटांना मुंग्या येऊ लागल्या. मग डॉक्टरांकडे गेलो असता रक्त तपासणी करणेस सांगीतले. त्यात फास्टिंग ग्लूकोज २६२.८० तर जेवणानंतर ची ग्लूकोज ३५१ आली. मग डॉक्टरांनी मधुमेहासाठी औषधे सुरू केली.२०२३-२०२५ असे २ वर्षे औषधे घेऊनही शुगर लेवल २५० च्या खाली येईना. मग सोशल मीडियावर डॉ जगन्नाथ दीक्षित डायबेटिस रिवर्सल सेंटर ची माहिती मिळाली. मी दुसरे ओपिनियन म्हणून ३/४/२५ रोजी पुणे येथील शाखेत एचबीएवनसी टेस्ट करून घेऊन गेलो. तेथे गोखले सर आणि शिल्पा मॅडम यांनी रिपोर्ट पाहून डॉ दीक्षित जीवनशैली बद्दल माहिती दिली. ५५ मिनिटांमध्ये दोन जेवण, औषधे कशी घ्यावीत, व्यायाम काय करावा सर्व मार्गदर्शन केले.
गोखले सरांच्या सुचनेनुसार, दर महिन्याला एचबीएवनसी टेस्ट करून सेंटर मध्ये जात होतो. व गोखले सर माझे रिपोर्ट्स पाहून सुधारणा होत असल्याचे सांगत होते व त्यानुसार वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते. मलाही खूप छान वाटत होते. रोज ५५ मिनिटांमध्ये क्रमाने पदार्थ खाऊन मग जेवण व रोज सकाळ/संध्याकाळ एक तास १ तास चालणे अशा जीवनशैली ची सवयच झाली. हे मधुमेहातून पूर्ण बरे होण्यासाठी खूप आवश्यकच होते.
अखेर तो दिवस उजाडला. दिनांक १०/३/२६ रोजी माझे एचबीएवनसी ५.५% व फास्टिंग इन्सुलिन ६.२ येऊन मी नॉन डायबिटीस स्टेज मध्ये आलो. माझे रिपोर्ट्स पाहून माझा डॉ जगन्नाथ दीक्षित सरांच्या हस्ते सेंटर मध्ये सत्कार करण्यात आला. मला खूप आनंद झाला व यासाठी मी डॉ जगन्नाथ दीक्षित सर, गोखले सर, शिल्पा मॅडम व कैलास यांचे मनपूर्वक आभार मानतो.
मी सदरची जीवनशैली आयुष्यभर स्वीकारणार आहे तसेच माझ्या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींना, मधुमेही रुग्णांना, मित्रांना या जीवनशैली ची माहिती देणार आहे.
पुन्हा एकदा मी गोखले सर, शिल्पा मॅडम व सेंटर मधील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार मानतो.


