आजची यशोगाथा : पूजा देशपांडे ( ३० मे २०२६ )

0

आजची यशोगाथा : पूजा देशपांडे ( ३० मे २०२६ )

परिचय पत्र

नाव: पूजा देशपांडे
वय: ५१ वर्षे
उंची: १५० सेमी
व्यवसाय: शिक्षिका
वास्तव्य: नागपूर
समूह: एक्सप्लोरर्स
मोबाईल: ८९५६७६२४४१

मी बऱ्याच काळापासून वजनवाढीच्या समस्येशी झुंज देत होते आणि त्याचा माझ्या दैनंदिन जीवनावर अनेक प्रकारे परिणाम होऊ लागला होता. कमी ऊर्जा, शरीरातील अस्वस्थता आणि खाण्याच्या इच्छा नियंत्रित न होणे यामुळे परिस्थिती अधिकच कठीण झाली होती. तेव्हाच मला यूट्यूबवर डॉ दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांच्या चॅलेंजची माहिती मिळाली. त्यामध्ये काहीतरी असे होते जे मला मनापासून पटले आणि जेव्हा मला समजले की हे चॅलेंज १ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार आहे, तेव्हा मी त्यात सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. होळी, गुढीपाडवा आणि अक्षयतृतीया यांसारखे सण जवळ येत असल्यामुळे मनात थोडी शंका होती, पण मी कारणांपेक्षा माझ्या निर्धाराला महत्त्व दिले. मी स्वतःला १००% देण्याचे ठरवले.
मी हा कार्यक्रम प्रामाणिकपणे पाळला — नियमितपणे जेवणाचे फोटो शेअर केले, व्यायामाचे अपडेट्स दिले आणि सांगितलेल्या शिस्तीचे पालन केले. त्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले:
७ मार्च २०२६: पहिल्या महिन्यात ३ किलो वजन कमी झाले
७ एप्रिल २०२६: आणखी २ किलो वजन कमी झाले आणि जीवनशैलीत लक्षणीय सुधारणा जाणवली

९० दिवसांच्या शेवटी झालेला बदल केवळ दिसण्यापुरता नव्हता, तर मनापासून समाधान देणारा होता:
एचबीएवनसी: ६.२% वरून ५.८%
फास्टिंग इन्सुलिन: १४.४ वरून ९.६
वजन: ८० किलो वरून ७३ किलो
कंबरेचा घेर: १०० सेमी वरून ९५ सेमी

या परिणामांमुळे मी खूप आनंदी आहे. मी ही जीवनशैली आयुष्यभर पाळणार आहे. डॉ दीक्षित आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मी मनःपूर्वक आभारी आहे.

(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts