आजची यशोगाथा : राजेंद्र वीर ( १६ मे २०२६ )
परिचय पत्र
नाव : राजेंद्र वीर
वय: ५३ वर्षे
उंची: १७० सेमी
वास्तव्य: बेलापूर, नवी मुंबई
व्यवसाय : सुरक्षा पर्यवेक्षक
समूह: ठाणे-मुंबई समूह
मोबाइल: ९१३७५८०८४२
माझे नाव राजेंद्र सयाजी वीर. असून मी मुंबई ठाणे ७ या ग्रुपचा सदस्य होतो. आज माझ्या आरोग्य परिवर्तनाचा अनुभव तुमच्यासोबत सामायिक करताना मला खूप आनंद होत आहे.
काही महिन्यांपूर्वी माझी तब्येत ठीक नव्हती. रक्त तपासणी केल्यानंतर माझे एचबीए१सी ९.५% आले आणि मला मधुमेह असल्याचे स्पष्ट झाले. माझे वजन ८१ किलो होते. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्या वेळी मी ठरवले की आता आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायचे.
मी डॉक्टर दीक्षित लाईफस्टाईलचे नियम किमान तीन महिने काटेकोरपणे पाळण्याचा निर्णय घेतला. पूर्ण प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने मी हा प्रवास सुरू केला. या प्रवासात प्रशासक प्राप्ती गांधी मॅडम, कीर्ती लांडे मॅडम आणि मयुरेश नातू सर यांनी वेळोवेळी खूप छान मार्गदर्शन केले. फक्त एका महिन्यातच मला चांगले परिणाम दिसू लागले. माझे एचबीए१सी ९.५ वरून ७.५ झाले आणि वजन ८१ वरून ७८ किलो झाले. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.
तीन महिन्यांनंतर तर परिणाम खूपच उत्तम होते. माझे एचबी१एसी ६ वर आले आणि वजन ७५ किलो झाले. पोटाचा घेरही लक्षणीयरीत्या कमी झाला. मी स्वतःला अधिक हलके, ऊर्जावान आणि आनंदी अनुभवू लागलो.
हा बदल पाहून मला खूप समाधान वाटले. हे सर्व डॉक्टर दीक्षित सर आणि सर्व प्रशासक यांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाले. त्यांचे मी मनापासून आभार मानतो.
आज मी अधिक निरोगी, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगत आहे.
(मराठी संकलन: मृगेंदु जोशी)


