आजची यशोगाथा : सुनिल मेश्राम

0

आजची यशोगाथा : सुनिल मेश्राम

परिचय पत्र

नाव: सुनिल मेश्राम
वय: ४३ वर्षे
उंची: १६५ सेंमी
व्यवसाय: शिक्षक
वास्तव्य: यवतमाळ
समूह: DM-REV27
मोबाईल: ९८५०३५३९५५

मी सुनील मेश्राम, व्यवसाय शिक्षक नेर, यवतमाळ. माझे वय ४३ असून जेव्हा मला डॉक्टर दीक्षित जीवनशैली याबद्दल डॉक्टर मून सर यांच्याकडून माहिती मिळाली तेव्हा मी डॉक्टर दीक्षित जीवनशैली चे पालन करण्याचे ठरविले. मी मेघना भिडे मॅडम यांच्याशी संपर्क केला आणि मग त्यांनी मला रक्त तपासणी करायला सांगितले. रिपोर्ट नुसार प्रथम एचबीए१सी ६.९३ उपवास इन्सुलिन ७.४ आले होते तसेच वजन ७४ किलो, पोटाचा घेर ९१ सेंमी होता.
नियमित व्यायाम आणि डॉ दीक्षित जीवनशैली नुसार डायट फॉलो करण्यास सुरुवात केली. रोज मी पाच वाजता उठून साडेचार किलोमीटर चालत असे. सोबतच जेवणाचे पण फोटो दररोज मी या ग्रुपवर शेअर करत होतो. कोणताही व्यत्यय न येऊ देता पूर्णपणे मी या जीवनशैली चे पालन केले. आश्चर्याची बाब म्हणजे असे की अवघ्या दीड महिन्यातच माझे एचबीए१सी हे ५.०४ व फास्टिंग इन्सुलिन ३.६ आले वजन ७२ किलो व पोटाचा घेर ८६ सेंमी झाली. कोणतेही औषधे न घेता मी मधुमेह मुक्त झालो आहे.
मेघना भिडे मॅडम यांचे सतत लाभलेले मार्गदर्शन आणि त्यांच्या टीमने केलेले मार्गदर्शन याबद्दल मी डॉ. दीक्षित सर व त्यांच्या टीमने केलेल्या अचूक मार्गदर्शनाबद्दल अत्यंत आभारी आहे. डॉ दीक्षित सर यांचा सुद्धा मी ऋणी आहे सातत्याने मी सरांचे व्हिडिओ पाहत होतो व आपण सुध्दा हे करू शकतो याची प्रेरणा मिळत गेली आणि मॅडमनी सक्सेस स्टोरीज या ग्रुप वर टाकल्या त्याचा खूप फायदा झाला आणि आपल्याला सुद्धा असंच करायचं आहे आणि आपल्याला सुद्धा ध्येय साध्य करायचे आहे यासाठी मी सातत्याने या बाबीकडे लक्ष देत गेलो
फक्त जीवनशैलीत बदल केल्याने एवढा फरक येऊ शकतो. हे एक अद्भुत व आश्चर्यकारक आहे. मी डॉ दीक्षित जीवनशैली सातत्याने आत्मसात करत राहणार व नियमित पणे आदरणीय मेघना भिडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे डायट घेत राहणार.

झालेला बदल.
एचबीए१सी% — ६.९३ चे ५.०४
उपवास इंसुलिन – ७.४ चे ३.६
वजन – ७४ किलो चे ७२ किलो
पोटाचा घेर – ९१ सेंमी चे ८६ सेंमी

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts