आजची यशोगाथा : स्वाती धनवड ( १८ एप्रिल २०२६ )
परिचय पत्र
नाव: स्वाती धनवड
वय: ३० वर्षे
उंची: १६२ सेमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: नोकरी
समूह: PUNE PD Group
मोबाईल: ७०२०२४२२४९
मागील जवळजवळ २/३ वर्षांपासून मी वाढलेल्या वजनामुळे खूप त्रस्त होते. त्याचबरोबर मी प्रीडायबेटीसच्या सीमेवर होते ही देखील एक चिंता होती. यूट्यूबवरून मला डॉ. दीक्षित जीवनशैलीबद्दल माहिती मिळाली आणि ७ वी ९०-दिवसांची चॅलेंज याबद्दल कळले. ही चॅलेंज १ जून २०२५ पासून सुरू होणार होती. गणेशोत्सवामुळे कुटुंबीयांना थोडी शंका होती, तरीही मी त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
मी सुरुवात थोडी सावकाश पण सातत्याने केली. पूर्णपणे कटिबद्ध नसतानाही मी जेवणाचे फोटो शेअर करणे, व्यायामाची माहिती देणे आणि बहुतेक वेळा शिस्त पाळणे हे कसेबसे करत राहिले.
पहिल्या महिन्यात माझे २ किलो वजन कमी झाले, जे माझ्यासाठी एक मोठे यश होते. त्यामुळे मला खूप उत्साही आणि हलके वाटू लागले. जरी माझ्या प्रयत्नांत सातत्य नसले तरी आमच्या अॅडमिनचे ग्रुपमधील संदेश मला सतत जागरूक ठेवत होते. पुढील २ महिन्यांतही प्रगती सुरूच राहिली. ९० दिवसांच्या शेवटी माझे आणखी ३ किलो वजन कमी झाले आणि कंबरेचा घेर ४ सेमीने कमी झाला.
तीन महिन्यांनंतर:
एचबीएवनसी: ५.५ → ५.३
वजन: ९० किलो → ८५ किलो
कंबरेचा घेर: १०२ सेमी → ९८ सेमी
माझे जवळजवळ ५ किलो वजन कमी झाले, जे या चॅलेंजमधील माझे मोठे यश होते आणि मागील २/३ वर्षांपासून ज्यासाठी मी प्रयत्न करत होते त्या आनंदाचे कारण ठरले. या चॅलेंजमुळे माझी ऊर्जा वाढली, ज्यामुळे मधुमेह कमी करण्यास मदत झाली आणि काम व वैयक्तिक आयुष्यात समतोल राखण्यासही मदत झाली. निरोगी राहण्यासाठी आणि मधुमेहमुक्त जीवन जगण्यासाठी मी ही जीवनशैली कायमस्वरूपी पाळणार आहे.
डॉ. दीक्षित सर आणि आमचे ग्रुप अॅडमिन श्रीकांत डंके सर यांचे सतत पाठपुरावा आणि मार्गदर्शनासाठी मी मनःपूर्वक आभार मानते.
(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)


