आजची यशोगाथा : प्रज्ञा श्रीवास्तव ( ६ एप्रिल २०२६ )
परिचय पत्र
नाव: प्रज्ञा श्रीवास्तव
वय: ४७ वर्षे
उंची: १६५ सेमी
वास्तव्य: लखनऊ
व्यवसाय: दंत शल्यचिकित्सक
समूह: RMI PDND
मोबाईल: ७९०५१६२२९४
माझे वजन वाढणे आणि गुडघ्यांमध्ये वेदना यामुळे माझ्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत होता. मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांचे चॅलेंज यूट्यूब वरून समजले. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मला सहभागी होण्यासाठी आणि डॉ. दीक्षित जीवनशैलीचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित केले, कारण ती खरोखरच आशादायक वाटत होती।
मी चॅलेंजदरम्यान पूर्णपणे कटिबद्ध राहिले—जेवणाचे फोटो शेअर करणे, व्यायामाचे अपडेट्स देणे आणि कार्यक्रमात शिकवलेल्या शिस्तीचे पालन करणे। पहिल्या महिन्यात प्रगती फारशी दिसत नव्हती, पण चॅलेंजच्या शेवटी मी ५.७ कि.ग्रॅ. वजन आणि ६.४ सेमी कंबरेचा घेर कमी करण्यात यशस्वी झाले।
९० दिवसांच्या शेवटी:
एचबीएवनसी : ४.९ → ४.६%
वजन: ७६.८ → ७१.१५ कि.ग्रॅ.
कंबर: ९१.४ → ८५ सेमी
इतर सुधारणा: उर्जेची पातळी वाढली, गुडघ्यांच्या वेदनांमध्ये घट झाली। या चॅलेंजमधील सर्वात मोठा फायदा म्हणजे चांगल्या सवयींची निर्मिती। आता मला माझ्या खाण्याच्या इच्छांवर (cravings) अधिक नियंत्रण आहे, मी अन्नाचे सेवन आणि निवड याबाबत अधिक शिस्तबद्ध आहे। माझ्या मते, अन्न घेण्याचा क्रम हा गेम चेंजर आहे! कारण अन्नाचा योग्य क्रम पोषणमूल्य वाढवतो आणि कॅलरीचे सेवन कमी करतो। यामुळे अधिक वेळ पोट भरल्यासारखे वाटते, साखर आणि इन्सुलिनचे अचानक वाढणे कमी होते।
मी डॉ. दीक्षित सर, कविता मेहेंदळे मॅडम, अनंत सर, संजीव सिंगजी, रामकृष्ण अहिरेजी आणि समूहातील सर्व टीम सदस्यांचे त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानते। माझी जीवनशैली आणि आहाराच्या सवयी कायमस्वरूपी सुधारण्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद।
(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)


