आजची यशोगाथा : गणेश स्वामी ( २१ मार्च २०२६ )
परिचय पत्र
नाव: गणेश स्वामी
उंची: १६५ सेंमी
वय: ३३ वर्षे
वास्तव्य: चंद्रपूर
व्यवसाय: शासकीय नोकरी
समूह: RMI DYDN
मोबाईल: ९५९५२३५३२३
मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूल जिल्हा चंद्रपूर येथे वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे. एके दिवशी मी टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला. त्याकरिता संबंधित कंपनीने माझे दिनांक १२ में २०२५ रोजी मेडिकल केले तो रिपोर्टपाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली . त्या रिपोर्टनुसार मी मधुमेही झालो होतो. रिपोर्टनुसार माझा एचबीएवनसी ९.२% इतका होता. मग लातूरला डॉक्टरांकडे गेलो. त्या डॉक्टरांनी मला १५०० रु च्या एक महिन्याच्या गोळ्या दिल्या, आणि सांगितले आता आयुष्यभर गोळ्या खाव्या लागणार. इतक्या कमी वयामध्ये मधुमेह आणि आयुष्यभर गोळ्या खाणे हे मनाला पटत नव्हते. हॉस्पिटल ला जातानाच चॅट जीपीटीवर सर्च करत होतो. लातूर मधील मधुमेहासाठी नामांकित डॉक्टर कोण असं सर्च करताच मा. डॉ जगन्नाथ दीक्षित सरांचे नाव पहिल्यांदाच दिसले. त्यानंतर तिथेच सरांच्या व्हिडिओची लिंक दिली होती त्यावर क्लिक केलं. तो व्हिडिओ डॉ दीक्षित सरांच्या व्याख्यानाचा होता त्या व्याख्यानामध्ये त्यांनी जीवनशैली बद्दल समजावून सांगितले होते त्यावेळी समजले की आपली शुगर गोळ्या न खाता ही कमी होऊ शकते. मग व्हिडिओमध्येच दिलेल्या एका नंबर ला मी कॉल केला. त्यामुळे मेघना भिडे मॅडम यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केले.
त्यांनी मला सांगितलं की डॉ दीक्षित लाईफस्टाईल फॉलो करायचे असेल तर गोळ्या चालू करू नका. त्यानंतर मी आणलेल्या गोळ्या परत दिल्या आणि मॅडमनी मला डॉ दीक्षित सरांच्या १ जून रोजी सुरू होणाऱ्या सातव्या वेट लॉस व शुगर रिवर्सल कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास सांगितले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आणि अतिशय प्रामाणिकपणे सांगितलेल्या नियमांचे पालन केले . सातव्या लाइफस्टाइल चॅलेंज च्या सुरुवातीला ग्रुप ॲडमिन पद्मा मॅडम यांचेही मोलाचे मार्गदर्शन मला लाभले. आज ९० दिवसाच्या वेट लॉस आणि शुगर रिव्हर्सल कार्यक्रमामुळे मी मधुमेहा पासून पूर्णपणे मुक्त झालो आहे. मी दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ रोजी केलेल्या टेस्टनुसार माझा एचबीएवनसी ५.५% आहे . हे पाहून मला खूप आनंद झाला. मेघना भिडे मॅडम आणि पद्मा मॅडम यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे आणि डॉ दीक्षित जीवनशैली मुळे मी आज निरोगी आहे.
माझे ९० दिवसांनंतरचे अंतिम निकाल:
एचबीएवनसी: [९.२] → [५.५]
वजन: [५९] → [५६]
कंबर: [८४] → [८२]
ही लाईफस्टाईल मी आयुष्यभर स्वीकारणार आहे तसेच मी माझ्या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींना, मित्र, नातेवाईक आणि मधुमेह रुग्ण यांना या जीवनशैलीची माहिती देणार आहे. या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित सर, पद्मा मॅडम आणि मेघना भिडे मॅडम यांचा मनापासून आभारी आहे.
(मराठी पुनर्लेखन: डॉ रत्नाकर गोरे)


