आजची यशोगाथा : किशोर वैद्य ( ४ मार्च २०२६ )

0

आजची यशोगाथा : किशोर वैद्य ( ४ मार्च २०२६ )

परिचय पत्र

नाव: किशोर वैद्य
वय: ७० वर्षे
उंची: १६५ सेमी
वास्तव्य: वडोदरा
व्यवसाय: इलेक्ट्रिकल इंजिनिअर (निवृत्त)
मोबाईल: ९६६४९५१९९४

ऑक्टोबर २०२५ मध्ये मला माझी भाची कु. उज्वला लाठकर, नाशिक हिच्याकडून डॉ. दीक्षित यांच्या जीवनशैलीबद्दल माहिती मिळाली.
ही जीवनशैली सुरू करण्यापूर्वी मला सुमारे दोन वर्षांपासून मधुमेह होता. निदानाच्या वेळी माझी एचबीएवनसी ६.५% होती आणि माझे वजन ७८ किलो होते. कालांतराने, माझ्या डायबेटोलॉजिस्ट यांनी मला दिवसातून दोन वेळा मेटफॉर्मिन घेण्याचा सल्ला दिला, कारण माझी उपाशीपोटी साखर १४५ mg/dl आणि दुपारच्या जेवणानंतरची साखर २१४ mg/dl होती.
नियमित चालणे आणि प्रयत्न करूनही माझे वजन कमी होत नव्हते. ऑक्टोबर २०२५ मध्ये, माझ्या भाचीच्या सल्ल्यानुसार मी डॉ. दीक्षित सरांशी संपर्क साधला. त्यांनी मला त्यांच्या आहार योजनेबद्दल वैयक्तिक मार्गदर्शन केले. या योजनेमध्ये दिवसातून दोन वेळा जेवण आणि दररोज किमान ४.५ किमी चालणे समाविष्ट आहे. मी ही योजना प्रामाणिकपणे पाळण्याचा निर्णय घेतला आणि दर महिन्याला माझा एचबीएवनसी तपासला. पहिल्या महिन्यानंतर माझा एचबीएवनसी ६.१४% पर्यंत सुधारला आणि माझे वजन ७३ किलो झाले.

सुरुवातीचा काळ आव्हानात्मक होता, कारण मला दर काही तासांनी खाण्याची सवय होती. परंतु एकदा दिवसातून दोन वेळा जेवण्याची सवय लागल्यानंतर, मी दररोज किमान ४५ मिनिटे वेगाने चालणे सुरू ठेवले आणि त्यासोबत दररोज एक तास योगाचा समावेश केला. काही आठवड्यांतच माझे वजन सतत कमी होत गेले. डॉ. दीक्षित यांच्या सल्ल्यानुसार मी मेटफॉर्मिन घेणे बंद केले.
तीन महिन्यांनंतर माझे वजन ७८ किलोवरून ६६.८ किलोपर्यंत कमी झाले आणि माझी एचबीएवनसी ५.५% पर्यंत खाली आली, जी सामान्य श्रेणीत आहे. मधुमेही अवस्थेतून पूर्व-मधुमेही अवस्थेत झालेल्या या उल्लेखनीय बदलामुळे मला अत्यंत आनंद झाला आहे. डॉ. दीक्षित सरांच्या मौल्यवान मार्गदर्शन आणि प्रोत्साहनाबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे. आता मी माझ्या मित्र-परिवाराला उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्तीकरिता डॉ. दीक्षित यांच्या जीवनशैलीची शिफारस करतो.

(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts