आजची यशोगाथा : हरीश देशमुख ( २८ फेब्रुवारी २०२६ )

0

आजची यशोगाथा : हरीश देशमुख ( २८ फेब्रुवारी २०२६ )

परिचय पत्र

नाव: हरीश देशमुख
वय: ५० वर्षे
उंची: १८२ से.मी.
वास्तव्य: कर्वेनगर, पुणे
समूह: DRCC, Pune PD ग्रुप
मोबाईल: ९७६७९९३९३९

माझ्या पत्नीने सांगितले की तिला डॉ. दीक्षित लाइफस्टाइल सुरू करायची आहे आणि नळ स्टॉप सेंटरला जायचे आहे. तिच्या आग्रहामुळे मीदेखील तिच्यासोबत गेलो. तिथे डॉक्टरांनी आम्हाला फास्टिंग इन्सुलिन आणि एचबीएवनसी चाचण्या करून रिपोर्ट घेऊन येण्यास सांगितले.

प्रारंभिक अवस्था:

दिनांक ३/८/२५ रोजी मी माझी फास्टिंग इन्सुलिन आणि एचबीएवनसी तपासणी केली —

एचबीएवनसी: ५.७%
उपाशीपोटी इन्सुलिन: 12.70
वजन: सुमारे ७५ किलो

या रिपोर्टवरून मला समजले की मी प्री-डायबेटिक अवस्थेत आहे, आणि याबद्दल मला आधी काहीच माहिती नव्हती.

डॉ. दीक्षित सेंटरचा अनुभव:

४ ऑगस्ट रोजी आम्ही सेंटरवर गेलो. तिथे झालेले काउन्सेलिंग आणि लेक्चर ऐकून डायबेटीसविषयीच्या आमच्या अनेक चुकीच्या समजुती दूर झाल्या.
५ ऑगस्टपासून आम्हा दोघांनीही डॉक्टरांनी सुचवलेली जीवनशैली काटेकोरपणे पाळायला सुरुवात केली

दिवसातून फक्त दोन वेळा जेवण
५५ मिनिटांच्या आत तीन पदार्थ ठरलेल्या क्रमाने, आणि मग मुख्य जेवण पूर्ण करणे
सोबत नियमित व्यायाम

दोन महिन्यांनंतरचे परिणाम:

एचबीएवनसी: 5.7 → 5.4
फास्टिंग इन्सुलिन: 12.70 → 6.40
वजन: ७५ किलो → सुमारे ७१ किलो (४ किलोने घट)

शरीरात ऊर्जा वाढली, झोपेत खूप सुधारणा झाली आणि एकंदर ताजेपणा व हलकेपणा जाणवू लागला.

मी प्री-डायबेटिक अवस्थेतून नॉन-डायबेटिक अवस्थेत आलो आहे!
हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आणि आत्मविश्वास वाढवणारे आहे.

मी मनापासून आभारी आहे:

मार्गदर्शनासाठी डॉ. दीक्षित सरांचे
तसेच काउन्सेलिंग सेंटरमधील सर्व सहकाऱ्यांचे, ज्यांनी आम्हाला नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा दिली.

आता मी ठामपणे ठरवले आहे:
डॉ. दीक्षित लाइफस्टाइल आयुष्यभर पाळायची.
डायबेटीस-मुक्त आणि निरोगी जीवन जगायचे
आणि या बद्दल इतरांनाही सांगून त्यांनादेखील प्रेरित करायचे!

(मराठी लेखन: शिल्पा उनकुले)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts