आजची यशोगाथा : शीतल कुलकर्णी
परिचय पत्र
नाव: शीतल कुलकर्णी
वय: ४४ वर्षे
उंची: १६० सेमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: गृहिणी
ग्रुप: Pune DYDN
मोबाईल: ९५४५३४१३०४
मला उच्च रक्तदाब, मधुमेह व थायरॉईड या समस्यांमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या. मला गेल्या पाच वर्षांपासून BP आणि मधुमेहाच्या गोळ्या चालू आहेत. मला चालताना दम लागत होता, तसेच काही काम केले तरी थकवा येत होता. कोणत्याही कामात उत्साह वाटत नव्हता. मला डॉ. दीक्षित लाइफस्टाईल आणि 90 दिवसांचे चॅलेंज याबद्दल मैत्रिणीकडून माहिती मिळाली. हे चॅलेंज 1 जून 2025 पासून सुरू होणार असल्याचे कळल्यावर मी ठाम निर्णय घेतला. कुटुंबीय आणि मित्रांना खात्री नव्हती, विशेषतः गौरी गणपती सारख्या सणांमुळे, पण मी पूर्णमनाने हे चॅलेंज करण्याचे ठरवले. मी पूर्णशिस्त पाळली: जेवणाचे फोटो शेअर केले व्यायाम/क्रियाकलाप अपडेट केले, प्रोग्राममध्ये शिकवलेल्या सवयी अंगीकारल्या.
पहिल्या महिन्यात माझे वजन 68 kg वरून 65 kg झाले व एचबीएवनसी 6.10 वरून 5.60 इतके झाले. दुसऱ्या महिन्यात वजन अजून 3 kg ने कमी झाले, तसेच एचबीएवनसी 5.60 वरून 5.40 झाले.
90 दिवसांनंतरचे अंतिम निकाल:
एचबीएवनसी: 6.10 → 5.6%
वजन: 68 kg → 62 kg
कंबर: 104 cm → 100 cm
इतर सुधारणा: थकवा कमी झाला, उर्जावाढली, वेदना कमी झाल्या.
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे:
मला बाहेरचे खाण्याची खुप आवड होती, त्यावर मी नियंत्रण करायला शिकले. माझी मनोवृत्ती सुधारली.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित सर आणि करिश्मा साळवी मॅडम, महेश जगताप सर यांची मनापासून आभारी आहे.


