आजची यशोगाथा : प्रकाश रहाळकर ( १६ फेब्रुवारी २०२६ )

0

आजची यशोगाथा : प्रकाश रहाळकर ( १६ फेब्रुवारी २०२६ )

परिचय पत्र

नाव: प्रकाश रहाळकर
वय: ६६ वर्षे
उंची: १६५ से.मी.
व्यवसाय: सराफ (ज्वेलर)
निवास: मुंबई
समूह: मुंबई-DYDN गट
मोबाईल: ९९६९३८७९५८

मी १ जून २०२५ पासून डॉ. दीक्षित जीवनशैलीचा अवलंब करण्यास सुरुवात केली. माझ्या आरोग्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या ठाम निर्धाराने हा प्रवास सुरू केला. या जीवनशैलीला सुरुवात करण्यापूर्वी मला काही शारीरिक व चयापचयाशी संबंधित समस्या होत्या. माझी सहनशक्ती कमी होती, वारंवार ऍसिडिटीचा त्रास होत होता आणि रक्तातील साखरेच्या पातळीबाबत चिंता होती. शारीरिक हालचाली करण्याची क्षमता मर्यादित होती आणि अनेकदा थकवा जाणवत असे. त्यामुळे अल्पकालीन उपायांपेक्षा शास्त्रीय व शाश्वत जीवनशैली स्वीकारण्याचा मी निर्णय घेतला.
डॉ. दीक्षित जीवनशैलीचा अवलंब केल्यानंतर माझ्या आरोग्यात हळूहळू पण सातत्याने सुधारणा होत गेली. माझ्या शारीरिक सहनशक्तीत लक्षणीय वाढ झाली. पूर्वी मी सहजपणे केवळ ३.५ किलोमीटर चालू शकत होतो, पण आता माझी चालण्याची क्षमता ५ किलोमीटरपर्यंत वाढली आहे. यामुळे माझी ताकद, सहनशक्ती आणि एकूणच फिटनेस सुधारला आहे.
अॅसिडिटीच्या समस्येतही लक्षणीय घट झाली आहे. नैसर्गिक व संतुलित आहारावर आधारित आहारयोजनामुळे पचनक्रिया सुधारली आणि पोटाशी संबंधित तक्रारी कमी झाल्या. सणासुदीच्या काळात थोडासा आहार बिघडला असला, तरीही मी माझे आरोग्य नियंत्रणात ठेवू शकलो. अधिक शिस्त पाळली असती तर परिणाम आणखी चांगले झाले असते, याची मला खात्री आहे.

माझा फास्टिंग इन्सुलिन स्तर ७.४ वरून ६.४ इतका कमी झाला आहे, जो चयापचय आरोग्यातील सकारात्मक बदल दर्शवतो. नियमित शारीरिक हालचाली आणि योग्य आहारामुळे मी अधिक ऊर्जावान, सक्रिय आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक वाटू लागलो आहे.
डॉ. दीक्षित जीवनशैलीमधील रेसिपीज केवळ पौष्टिकच नाहीत, तर अतिशय चविष्टही आहेत, त्यामुळे ही जीवनशैली पाळणे सोपे झाले आहे. या उत्कृष्ट जीवनशैलीसाठी मी डॉ. दीक्षित सरांचे मनापासून आभार मानतो. तसेच प्रशासनातील पूजा पवार मॅडम आणि शिवानी पोटणीस मॅडम यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि सततच्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक आभार. रेसिपी तयार करणाऱ्या टीम आणि डायटिशियन यांचेही मी आभार मानतो.
या संपूर्ण प्रवासात माझी पत्नी भारती रहाळकर आणि माझी सून नम्रता नागरेकर यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा विशेष आभारी आहे.
पुढील तीन महिन्यांत माझा एचबीएवनसी ६.३ वरून ५.७% पर्यंत कमी करण्याचे स्पष्ट उद्दिष्ट मी आजपासून निश्चित केले आहे. शिस्त, सातत्य आणि डॉ. दीक्षित जीवनशैलीच्या मदतीने हे उद्दिष्ट मी नक्कीच साध्य करेन, असा मला पूर्ण विश्वास आहे.

(मराठी अनुवाद: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts