आजची यशोगाथा : विशाल वसानी
परिचय पत्र
नाव: विशाल वसानी
वय: ३४ वर्षे
उंची: १८३ सेंमी
वास्तव्य: मुंबई
व्यवसाय: नोकरी
समूह: मुंबई PDND
मोबाईल: ९९२३२०९०००
मला डॉ. जगन्नाथ दीक्षित सरांच्या Lifestyle विषयी 2019 पासून माहिती होती. तेव्हा मी अधूनमधून दोन वेळा खाण्याचा नियम follow करायचो, पण जेव्हा जेव्हा बाहेरगावी जायचो किंवा काही विशेष प्रसंग असायचा तेव्हा हा नियम मोडायचो. त्यामुळे सातत्य राहत नव्हतं. या 90 दिवसांच्या Weightloss Challenge मध्ये मात्र मी स्वतःला पूर्णपणे शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न केला. पूर्ण90 दिवस मी strictly दोन वेळा जेवण केल. किंबहुना या 90 दिवसात असा पण प्रसंग आला की 2- 3 दिवस 1 च वेळ जेवलो, एवढंच नव्हे तर या काळात मी 5–6 वेळा मुंबईबाहेर गेलो, तरीदेखील दोन वेळच्या नियमाचं पालन केलं. कधी कधी जेवणाचा क्रम आणिवेळ मागे-पुढे झाला, पण नियम मोडला नाही. याचा परिणाम माझ्या वजनावरही स्पष्ट दिसतो. Challenge सुरू होण्याआधी माझं वजन 95 किलो होतं, आणिआता म्हणजेच 90 दिवसा अखेरीस ते 90 किलो वर आलं आहे. माझ्यासाठी हा प्रवास फक्त 90 दिवसांचा प्रयोग नव्हता, तर माझ्या नव्या आयुष्याचा प्रारंभ आहे. आता ही जीवनशैली माझ्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे आणिपुढे आयुष्यभर तो पाळण्याचा निर्धार मी केला आहे.


