आजची यशोगाथा : विवेक देशपांडे (२८ जानेवारी २०२६)
परिचय पत्र
नाव: विवेक देशपांडे
वय: ५५ वर्षे
उंची: १६८ सेमी
वास्तव्य: पुणे – पीसीएमसी परिसर
व्यवसाय: सेवा
समूह: पिंपरी चिंचवड ग्रुप
मोबाईल: ९९२२४३७५८७
मला मधुमेह, वजनवाढ यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत होता, ज्याचा माझ्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत होता. माझ्या भावासोबत झालेल्या दूरध्वनी संवादातून मला डॉ. दीक्षित लाइफस्टाईल आणि ९० दिवसांच्या चॅलेंजची माहिती मिळाली. तो स्वतः १ जून २०२५ पासून सुरू होणाऱ्या ९० दिवसांच्या चॅलेंज प्रोग्राममध्ये सहभागी होणार असल्याचे त्याने सांगितले. अशा प्रकारे माझ्या ९० दिवसांच्या चॅलेंज प्रवासाची सुरुवात झाली. जेव्हा मला कळले की हा चॅलेंज १ जून २०२५ पासून सुरू होणार आहे, तेव्हा मी ठाम निर्णय घेतला की मी यात सहभागी होणारच.
राखी पौर्णिमा, जन्माष्टमी आणि गौरी-गणपती यांसारखे सण जवळ येत असतानाही कुटुंबीय व मित्र थोडे साशंक होते, तरीही मी पूर्ण मनोभावे प्रयत्न करण्याचा निर्धार केला. प्रवासाची सुरुवात करताना माझे मोजमाप असे होते — एचबीएवनसी : ७.३%, वजन: ९२ किलो. मी कार्यक्रमातील शिस्त पूर्णपणे पाळली — जेवणाचे फोटो शेअर करणे, व्यायामाचे अपडेट देणे आणि दिलेल्या मार्गदर्शनानुसार आचरण करणे. पहिल्या महिन्यात माझे वजन ८८.४ किलो झाले आणि एचबीएवनसी ६.८% पर्यंत कमी झाले. पुढील महिन्यांत माझे वजन ८४.५ किलो झाले आणि एचबीएवनसी ६.४% पर्यंत घटले.
वजन कमी झाल्यामुळे गुडघेदुखीमध्ये मोठ्या प्रमाणात आराम मिळाला आणि दिवसभर ताजेतवाने वाटू लागले. माझ्यासाठी सर्वात मोठी जाणीव म्हणजे निरोगी जीवनशैली केवळ आळस/थकवा कमी करत नाही, तर आत्मविश्वास वाढवते आणि सहनशक्तीही अधिक मजबूत करते.
मी मनापासून डॉ. दीक्षित, सौ. अंजली पाठक आणि सौ. कविता शिंदे यांचे त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पाठिंब्यासाठी आभार मानतो.
(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)


