आजची यशोगाथा : सुरेश खर्से (२४ जानेवारी २०२६)

0

आजची यशोगाथा : सुरेश खर्से (२४ जानेवारी २०२६)

परिचय पत्र

नाव: सुरेश खर्से
वय: ५१ वर्षे
उंची: १६० सेमी
वास्तव्य: मोशी
व्यवसाय: प्रायव्हेट नोकरी
समूह: पिंपरी चिंचवड
मोबाईल: ८३२९११९७१९

मला मधुमेह, या समस्यांमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या. मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि 90 दिवसांच्या चॅलेंज बद्दल सोशल मिडिया वरून मिळाली. हे चॅलेंज १-६-२५ पासून सुरू होणार असल्याचे कळल्यावर मी ठाम निर्णय घेतला. कुटुंबीय आणि मित्रांना खात्री नव्हती, विशेषतः सणांमुळे, पण मी पूर्णमनाने हे चॅलेंज करण्याचे ठरवले. कधी कधी मला नाही जमलं ते कामाच्या किंवा वैयक्तिक अडचणी मुळे जेवणाचे फोटो किंवा व्यायामाचे अपडेट नाही पाठवता आले. त्याबद्दल खरंच मनापासून माफी मागतो. मी प्रोग्राममध्ये शिकवलेल्या सर्व सवयी अंगीकारल्या. मला पहिल्या महिन्यातच माझी रक्तशर्करा कमी झाल्याचे दिसलं. जे २० वर्षात झाले नाही ते पहिल्या महिन्यातच झाले. पुढील महिन्यांमध्ये अजून प्रगती झाली.
90 दिवसांनंतरचे अंतिम निकाल:
एचबीएवनसी: सुरूवातीला ८%, तीन महिन्यांनंतर ६.९ %
वजन: सुरूवात ५५ किलो, तीन महिन्यांनंतर ५२.६५ किलो
कंबर: सुरूवातीला ८९ सेमी, तीन महिन्यांनंतर ८६ सेमी

इतर सुधारणा:
माझ्या औषधाची मात्रा कमी झाली.
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे:
आयुष्याला शिस्त लागली आणि चांगल्या सवयी जडल्या

या संपूर्णप्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित आणि अंजली मॅडम आणि कविता मॅडम यांचा मनापासून आभारी आहे. खरं तर आपल्याला जे फुकटात मिळते त्याची किंमत नसते, जिथे पैसे लागतात तिथे नंबर लावले जातात. डॉ दीक्षित सरांची ही जीवनशैली फुकट आहे पण यात सहभागी व्हा असे लोकांना सांगावे लागते ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मला जे अनुभव आले त्यावरून मात्र माझी बायको, माझे मित्र आणि मैत्रिणी पुढच्या चॅलेंज मध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. पुन्हा एकदा मनापासून आभार.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts