आजचा प्रश्न: १५ जानेवारी २०२६

0

आजचा प्रश्न: १५ जानेवारी २०२६

प्र- सर, आपण आम्हां नवीन सदस्यांना हा ऊपाय सुरू कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करू शकता का?
मी गेल्या 3-4 दिवसांपासून भुकेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करतोय पण....

उ – प्रिय पुनीत, बरे झाले तू हा प्रश्न विचारलास. मला खात्री आहे माझे उत्तर सगळ्यांच्या उपयोगी पडेल.
1- आपली खरी भुकेची वेळ ओळखणे खूप महत्त्वाचे. जर तुम्हाला स्वतहाची भुकेची वेळ ओळखणे जमत नसेल तर ,सकाळी 9 व संध्याकाळी 6 , अथवा दुपारी 1 आणि रात्री 9 या वेळांना जेवण करा. पहिले 8-10 दिवस अंगवळणी पडेपर्यंत थोडे बदल करून पहा.
2- एकदा ती वेळ समजली की त्याच वेळी जेवण करा .15-20 मिनीटे इकडे- तिकडे चालू शकते.
3- तुम्ही या दोन्ही 55 मिनिटांच्या अवधी मध्ये तुम्हाला आवडेल ते/ पाहिजे ते खाऊ शकता.
4- दोन जेवणांच्यामध्ये लागलेली भूक ही मानसिक असते. बरेचदा आपल्याला खाणे उपलब्ध आहे – समोर दिसते आहे म्हणून आपण खातो.आणि बरेच वेळा आपण तहान आणि भूक यात गोंधळ करतो .
5- जर मध्ये भूक लागलीच तर प्रथम पाणी प्या ,मग ताक पिऊन बघा, मग शहाळे प्या आणि राहवले नाही तर शेवटी एक टोमॅटो खा.
6- HbA1C आणि Fasting insulin या तपासण्या करून घ्या. तुम्ही मधुमेही(डायबेटिक), प्रिडायबेटीक का नॉर्मल आहात हे माहीत असणे आवश्यक आहें

या उत्तराने तुम्हाला डाएट प्लॅन सुरू करणे सोपे व्हावे अशी आशा बाळगतो.
शुभेच्छा.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts