आजची यशोगाथा : गीता जैन  ( २० डिसेंबर )

0

आजची यशोगाथा : गीता जैन  ( २० डिसेंबर )

परिचय पत्र

नाव: गीता जैन
वय: ५१ वर्ष
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: लोहारा, जळगाव ग्रुप: छ. संभाजीनगर मोबाईल: ९२८४३५०४००

मला सांधेदुखीचा त्रास होता आणि डॉक्टरांनी मला रक्तशर्करा तपासणी करायला सांगितली. तपासणीनंतर, २३ मे २०२५ रोजी मला कळाले की मला मधुमेह आहे, आणि डॉक्टरांनी लगेच औषधे सुरू करण्यास सांगितले. माझे एचबीए१सी १२.३ होते, आणि कुटुंबातील लोकही मला औषधे सुरू करायला सांगत होते. पण मी ठरवले की मी औषधे घेणार नाही.
मी डॉ. दीक्षित जीवनशैली बद्दल ऐकले होते. व्हाट्सएपवर थोडी शोधाशोध केल्यानंतर कळले की १ जून २०२५ पासून ७ वे ९०-दिवसीय डायबिटीज रिव्हर्सल आणि वजन कमी करण्याचे चॅलेंज (DRWL) सुरू होत आहे. मी लगेच त्यात भाग घेतला आणि ९० दिवसांपर्यंत या जीवनशैलीचे काटेकोर पालन केले.

आमचे एडमिन श्रीनिवास सर यांनी माझे चांगले मार्गदर्शन केले.त्यामुळे पहिल्याच महिन्यात माझे एचबीए१सी ८.४ झाले. इतके चांगले परिणाम मिळालेले पाहून मी खूप आनंदी व प्रेरित झाले, म्हणून अशाच प्रकारे या जीवनशैलीचे पुढेही पालन करत राहिले. मी दोन भोजनाच्या आहार योजनेचे चांगले पालन केले आणि ग्रुपमध्ये माझ्या भोजनाचे फोटो शेअर केले. तसे मी पायी चालण्यात थोडी कमी पडले, पण आव्हानातील बाकीच्या निर्देशांचे पालन करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. या मी केलेल्या शिस्तबद्ध प्रयत्नांमुळे, ९० दिवसांअखेर माझे एचबीए१सी आणखी कमी होऊन ७.२ झाले. माझे वजन ३.५ कि.ग्रॅ. ने कमी झाले. उपाशीपोटी इंसुलिन १०.२० ने कमी झाले.

माझी सांधेदुखी आता बरीच कमी झाली आहे. मला खूप उत्साही वाटत आहे आणि मी ठरवले आहे की या जादुई जीवनशैलीचे पालन मी जीवनभर करेन आणि लवकरच मधुमेह मुक्त होईन.

मी डॉ. दीक्षित सर चे आभार व्यक्त करते . तसेच माझे ग्रुप एडमिन श्रीनिवास बोलाबत्तीन सर, नाफडे सर,वाजळे सर आणि मेघना मॅडम यांचेही त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानते. सरते शेवटी एडोर ट्रस्टचेही धन्यवाद.

 

( मराठी अनुवाद: निखिल नाफडे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts