आजची यशोगाथा : माधवी सचिन करवा (२० नोव्हेंबर)

0

आजची यशोगाथा : माधवी सचिन करवा (२० नोव्हेंबर)

परिचय पत्र

आजची यशोगाथा*
नाव : माधवी सचिन करवा
वय: ३८ वर्षे
उंची: १५५ सेंमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: जालना
समूह: छ. संभाजीनगर
मोबाईल: ९०२८९१८४८४

मी माधवी करवा.. माझे वय ३८ असून खूप दिवसापासून वजन वाढीमुळे त्रस्त होते. वजन कमी करावे असे खूप मनात येत होते पण मार्गच मिळत नव्हता. म्हणतात ना. ‘कळतं पण वळत नाही’ तस माझ होत होतं. मे २०२५ मध्ये माझ्या मोठ्या दिरांकडून डॉ. दीक्षित सरांच्या ९० दिवसीय वजन कमी करण्याच्या चॅलेंज बद्दल समजले. त्यांनी आम्हाला ह्या चॅलेंज मधे भाग घ्यायचच असे सांगितले. रक्त तपासणी केली तेव्हा मी पूर्व मधुमेही असल्याचे समजले.
१ जून २०२५ पासून मी डॉ. दीक्षित सरांच्या जीवनशैलीचे पूर्णपणे पालन करू लागले. सुरुवातीला माझे वजन ७८ किलो होते. एचबीएवनसी ५.९% आणि उपाशीपोटी इंसुलिन १५.३५ युनिट होते. मी सुरुवातीला ३.३० किमी पर्यंत चालणे सुरु केले. नंतर माझे रोजचे चालणे ५ ते ६ किमी होत गेले. मला कधीही वाटले नाही की मी एका तासात इतकी चालू शकेन. हे सर्व डॉ. दीक्षित सर आणि ग्रुप अॅडमिन श्रीनिवास बोलाबत्तीन सर, निखिल नाफडे सर यांच्या सहकार्याने झाले.

अॅडमिन सरांनी प्रत्येक वेळी प्रोत्साहन दिले.
तीन महिन्याच्या चॅलेंज मध्ये माझे वजन ७ किलो ने कमी होऊन ७१ किलो झाले. एचबीएवनसी % ५.९ वरुन ५.५ झाले. पोटाचा घेर १०५ सेमी वरुन १०० सेमी झाला आणि उपाशीपोटी इंसुलिन १५.३५ वरुन ८.७२ युनिट झाले आहे. मी कोणत्याही औषधा शिवाय पूर्व मधुमेही ची मधुमेह मुक्त झाले. वजन ही खूपच कमी झाल्यामुळे खूपच आनंदी आहे. एकदम हलके हलके वाटत आहे. उत्साह वाढला आहे.
माझ्यात झालेला हा बदल फक्त आणि फक्त डॉ. दीक्षित सरांची जीवनशैली अंगीकारल्या मुळेच आहे. मी डॉ. दीक्षित सर आणि ग्रुप अॅडमिन श्रीनिवास बोलाबत्तीन सर, निखिल नाफडे सर यांना मनापासून धन्यवाद देते.
मी ही जीवनशैली कायमची पाळेन.

(मराठी पुनर्लेखन : श्रीनिवास बोलाबत्तीन)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts