आजची यशोगाथा : अश्विनी विनायक पाटील (१६ नोव्हेंबर)

0

आजची यशोगाथा : अश्विनी विनायक पाटील (१६ नोव्हेंबर)

परिचय पत्र

नाव : अश्विनी विनायक पाटील
वय: ५३ वर्षे
उंची: १६० सेंमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: चाळीसगांव(वाघळी)
*समूह: छ. संभाजीनगर *
मोबाईल: ७५८८६४८८४३

मला उच्चरक्तदाब आहे. दोन प्रकारच्या गोळया चालू होत्या .
. मी पूर्व मधुमेही होते, वजनही जास्त होते, त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास होता. गुडघ्या मध्ये गॅप आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या.
मला डॉ दीक्षित डाएट ची माहिती युटयूब वरून मिळाली. दि. ०१ जून २०२५ पासून सुरू होणाऱ्या ९० दिवसीय वेटलॉस चॅलेंज ची माहिती नाशिकच्या डीआरसीसी केंद्रामध्ये मिळाली. १ जून २०२५ पासून सुरु होणाऱ्या चॅलेंज मध्ये भाग घेण्याचा ठाम निर्णय घेतला. कुटुंबातील सदस्यांनी मला साथ दिली. विशेषतः पोळा, गणपती, गोकुळाष्टमी सारखे सण या कालावधीत होते. पण मी पूर्ण मनाने चॅलेंज मध्ये सहभागी व्हायचे ठरवले.
चॅलेंज दरम्यान मी पूर्ण शिस्त पाळली. जेवणाचे फोटो शेअर केले, व्यायामाचे अपडेट, स्क्रीनशॉट पाठवले. प्रोग्राममध्ये शिकवलेल्या सवयी अंगीकारल्या. जेवणाच्या ताटाचे फोटो टाकले, जेवणाचा क्रम पाळला.
जीवनशैलीत बदल केल्यामुळे पहिल्या महिन्यात माझे वजन ४.५ किलो कमी झालं. पूर्वी ३ किमी चालणे कठीण होते आता ५ किमी सहज चालू शकते.

९० दिवसानंतर एचबीए१सी ६.० चे ५.५ झालं, वजन ७३.५ किलो चे ६७ किलो झालं, कंबर ९७ सेमी ची ९० सेमी झाली , उपाशीपोटी इन्शुलिन १४.३ चे ९.३४ झालं.
मी पूर्व-मधुमेहीची मधुमेहमुक्त झाले. माझी बीपीची एक गोळी बंद झाली.
डॉ दीक्षित सर तसेच डॉ. अंजली मॅडम, डॉ. वेदा नलावडे, को-ऑर्डिनेटर मेघना भिडे, भक्ती जोशी यांचे मी मनापासून आभार मानते.
या चॅलेंज मध्ये दिलीप शेंडे, राजीव भालेराव, एडमीन निखिल नाफडे, मुकुंद वजाळे या सर्वांचे महत्वाचे योगदान आहे.
श्रीनिवास सर यांनी आमचा छत्रपती संभाजीनगर ग्रुप अॅक्टिव ठेवला. अगदी सकाळी उठल्या पासून रात्री पर्यंत सकाळचं वॉक, जेवणाचं ताट यांच्या स्क्रीनशॉट चे निरीक्षण करून सगळ्या ग्रुपवर लक्ष ठेवत होते. प्रत्येकाच्या शंकांना त्वरित उत्तर देत होते. प्रत्येकाला मोटिवेट करत होते. ग्रुप साठी सरांनी खूप श्रम घेतले म्हणून ग्रुप मध्ये सगळयांचे रिपोर्ट चांगले आले.
पुनश्च अडोर ट्रस्ट चे पदाधिकारी आणि डॉ दीक्षित सर याचे खूप खूप आभार. त्याच्या कार्याला विनम्र अभिवादन. कुठलीही अपेक्षा न ठेवता जनतेची सेवा करताहेत. भारत मधुमेह मुक्त करण्यासाठी काम करत आहेत. मी पण यात सहभागी होणार आणि मी माझा तालुका चाळीसगाव मधुमेह मुक्त करेन. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करेन. ८ व्या वेट लॉस चॅलेंज मध्ये मी पण सहकार्य करेन.
धन्यवाद.

(मराठी संपादन : श्रीनिवास बोलाबत्तीन)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts