यशोगाथा : किसन उढान
परिचय पत्र
नाव: किसन उढान
वय: ४७ वर्षे
उंची: १५७ सेंमी
व्यवसाय: शिक्षक
वास्तव्य: अंबड, जिल्हा- जालना
समूह: छ. संभाजीनगर
मोबाईल: ९८२२५२०९७३
माझी परिवर्तन कथा
डिसेंबर २०२३ रोजी माझी रक्त चाचणी केली . त्या चाचणीत मला मधुमेह असलेले आढळून आले. त्यावेळी माझा एचबीएवनसी १०.२% होता. डॉक्टरांनी मला मेटफार्मिन ५०/५०० गोळी सकाळी एक व संध्याकाळी एक अशाप्रकारे डोस चालू केला. काही दिवस मी गोळी घेतली. डॉ दीक्षित सरांबद्दल मला अगोदरच थोड्याफार प्रमाणात माहिती होती. यूट्यूब वर मी डॉ दीक्षित सरांची व्याख्याने ऐकली. त्यांच्या व्हिडिओच्या खाली दिलेल्या नंबर वर कॉल केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व चाचण्या त्यांच्या पद्धतीने करून घेतल्या. मला त्यांनी डॉ दीक्षित जीवनशैली समजावून सांगितली आणि मधुमेहाची औषधे न घेण्याचा सल्ला दिला. मी या जीवनशैलीचे काटेकोरपणे पालन केले व माझा एचबीएवनसी एका महिन्यातच १०.२ वरुन ९% पर्यंत खाली आला. त्यामुळे मोठ्या उत्साहाने ५ व्या डायबिटीस रिवर्सल व वेटलॉस चॅलेंज मध्ये भाग घेतला. त्यामध्ये माझा एचबीएवनसी ९% वरून ७.१% झाला. माझा उत्साह आणखीनच वाढला. मी या जीवनशैलीचे असेच पालन करत राहिलो व ६व्या वेटलॉस चॅलेंज मध्ये माझा एचबीएवनसी ६.२% झाला. म्हणजेच मी मधुमेही चा पूर्व–मधुमेही बनलो.
त्यानंतर काही काळासाठी मी निर्धास्त झालो व जीवनशैलीचे पालन करण्यात अक्षम्य दुर्लक्ष केले. माझा एचबीएवनसी वाढला आणि ८.१% झाला. पुन्हा मधुमेही बनल्यामुळे माझी चिंता वाढली. मी ७व्या वेटलॉस चॅलेंज मध्ये गांभीर्याने भाग घेतला आणि या जीवनशैलीचे ग्रुप एडमिन यांच्या मार्गदर्शनानुसार काटेकोरपणे पालन सुरू केले. चॅलेंज अंती माझा एचबीएवनसी ७.१% झाला आहे. या दरम्यान माझे वजन ६६ किलो वरून ६० किलो पर्यंत कमी झाले. कमरेचा घेर १०२ सेमी वरून ८५ सेमी झाला. आता मी एकदम ठीक झालो आहे. माझ्या चेहऱ्यावर चमक आली. तसेच काम करण्याचा उत्साह वाढला आहे.
या सर्व यशाचे श्रेय मी डॉ दीक्षित सर व त्यांच्या टीमला देत आहे. त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. यापुढेही डॉ दीक्षित जीवनशैलीचे पालन करून मधुमेह मुक्त होण्याचा निश्चय केला आहे. मी या जीवनशैलीचा लोकांमध्ये प्रचारही करत आहे. आज अंबड शहरात आठ जण याचा अनुभव घेत आहोत.
डॉ दीक्षित सर, श्रीनिवास सर, निखिल नाफड़े सर, मेघना भिड़े मॅडम याचे आभार मानतो व सर्व टीमचे धन्यवाद.


