यशोगाथा : समीर बागवान (६ नोव्हेंबर २०२५)
परिचय पत्र
नाव: समीर बागवान
वय: ५३ वर्षे
उंची: १७३ से.मी.
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: सातारा
मोबाईल: ९८५०६७०९०१
माझी परिवर्तन कथा
माझा मधुमेह मला गेले ६–७ वर्षे होता. मला मधुमेहासाठी औषधं चालू होती. माझ्या वजनात वाढ झाली होती. माझं वजन सुमारे ९६.५ किलोपर्यंत गेलं होतं.
एक दिवस युट्युबवर डॉ. दीक्षित यांचं व्याख्यान ऐकलं. त्यानंतर मला प्रेरणा मिळाली. मग आवश्यक त्या चाचण्या करून मी डॉ. सतीश पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मला समूहात जोडून घेतले. त्यांनी माझ्यासाठी योग्य असा आहार आणि व्यायामाचा कार्यक्रम ठरवला. त्याच दरम्यान मला ९० दिवसांच्या आव्हानाबद्दल माहिती मिळाली. हे आव्हान जून महिन्यांपासून सुरू होणार होते. मी त्यात भाग घेवून शिस्तबद्धपणे सगळं पाळू लागलो. तीन महिन्यांत माझं एचबीएवनसी ८.६ वरून ६.६% वर आलं आणि वजन ९६.५ किलोवरून ७३ किलोवर आलं. माझी ऊर्जा वाढली आणि औषधे कमी झाली.
माझा मधुमेह आहार व जीवनशैलीत बदल करण्याने पूर्णपणे नियंत्रणात आला.
पूर्वी माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडलेलं होतं. ऊर्जा नव्हती, काम करण्याची इच्छाही कमी झाली होती. पण आता मी पूर्ण ताजेतवाना, आनंदी आणि ऊर्जावान आहे.
माझ्या आरोग्याच्या सुधारणेत माझ्या संपूर्ण कुटुंबाचा मोठा सहभाग आहे. सर्व कुटुंबीयांनी माझे मनोबल वाढवलं.
या संपूर्ण प्रक्रियेत डॉ. दीक्षित आणि डॉ. सतीश पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे मी पुन्हा आत्मविश्वासाने आणि आनंदाने जगू लागले आहे. मला त्यांचे यांचं मनःपूर्वक आभार मानायचेत. त्यांनी दिलेली प्रेरणा आणि मार्गदर्शन माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरली.
(मराठी संपादन: डॉ रत्नाकर गोरे)


