यशोगाथा : उज्वला वीर
परिचय पत्र
नाव: उज्वला वीर
वय: ४८ वर्षे
उंची: १५० सेंमी
व्यवसाय: बेबी केअर जॉब
वास्तव्य: नवी मुंबई, बेलापूर
*समूह: ठाणे – मुंबई ग्रुप *
मोबाईल: ८२८६८०३५२१
माझी परिवर्तन कथा
२१ मार्च २०२५ रोजी माझ्या हाताला मुंग्या येत होत्या त्यावेळी मला डॉक्टरांनी रक्त तपासणी करायला सांगितले होते. तेव्हा माझ्या ब्लड रिपोर्ट मध्ये एचबीएवनसी ५.७% आले व वजन ६२ किलो होते. यूट्यूब पाहत असताना डॉ. दीक्षित सरांचा व्हिडिओ बघायला मिळाला, त्यामध्ये नम्रता ताईंचा नंबर मिळाला. त्यांनी डॉ. दीक्षित जीवनशैली द्वारा ९० दिवसांचे ७ वे आव्हान घेण्यात येणार असल्याचे सांगितले. या आव्हानाच्या संकल्पनेमागची शास्त्रशुद्ध भूमिका मला अत्यन्त आवडली आणि मी ही जीवनशैली अंगीकारण्याचा निर्णय घेतला.
पुढचे ९० दिवस माझ्या जीवनातील उत्कृष्ट कालखंड ठरला. ही दोन वेळची आहार पद्धती व रोजचे कमीतकमी ४.५ किमी चालणे, तसेच वेळोवेळी डॉ. दीक्षित सरांचे मार्गदर्शन हे शरीरात उत्साह व इच्छाशक्ती आणि मन आनंदी जागवणारे होते. फक्त दिवसातून दोन वेळा खाणं, त्यांचे स्क्रीन शॉट पाठविणे, रोजचा गूगल फॉर्म भरून घेणे, एक्सरसाइज करणे यावर ऍडमिन यांचे कटाक्षाने लक्ष होते. यामुळे जागरूकता आणि शिस्त अंगिकारली. शरीरात सकारात्मक बदल जाणवू लागले व आतून हलकेपणाची आणि ऊर्जा मिळाल्याची जाणीव झाली. आठवड्याचे ऍक्टिव्हिटी खूप छान होते, उत्साह वाटायचा.
एक ते दीड महिन्यात माझे वजन ५९ वरुन ५५ किलो पर्यंत कमी झाले. आणि उपाशीपोटी इंसुलिन ७.९६ वरून ६.५२ यूनिट इतके कमी झाले. त्यामुळे मधुमेहाची भीती मनातून हळूहळू नाहीशी झाली आणि आत्मविश्वास आणि आरोग्यावर नियंत्रणाची भावना वाढली. तसेच आमच्या ग्रुपच्या कार्यक्षम अॅडमिन प्राप्ती गांधी, किर्ती लांडे, मयुरेश नातू व मेघना भिडे मॅडम ह्या सुद्धा कटाक्षाने लक्ष द्यायच्या. रोजच्या रोज रेसिपी पाठवायच्या आणि छान मार्गदर्शन करायच्या.
तीन महिन्यानंतर माझे एचबीएवनसी ५.६% व वजन ५० किलो झाले. पूर्व मधुमेही पासून मधुमेह मुक्त झाले याचा मला खूप आनंद झाला. डॉ. दीक्षित सरांचे आभार व सर्व ॲडमिन प्राप्ती गांधी, कीर्ती लांडे, मयुरेश नातू, मेघना भिडे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे एकही गोळी न घेता हे शक्य झाले. या ९० दिवसांनी आरोग्य आणि जागरूकतेचा मजबूत पाया घालून दिला आहे. माझा प्रवास अजून सुरूच असून मला ही जीवनशैली पुढेही कायमस्वरूपी टिकवायची आहे आणि इतरांनाही मधुमेहमुक्त होण्याच्या दिशेने चालण्याची प्रेरणा द्यायची आहे.
डॉ. दीक्षित संराची समाजासाठी चाललेली धडपड सर्वांपर्यंत पोचलीच पाहिजे. आपण सर्वांनी मिळून हे काम केले पाहिजे. डॉक्टर दीक्षित सरांना व सर्व ॲडमिन ना उदंड दीर्घायुष्य, निरोगी आयुष्य लाभो. ग्रुप मधल्या सर्वांसाठी त्यांनी किती रात्रीचा दिवस केला आणि आमच्यासाठी किती धडपड यांचे मोल करता येणार नाही. डॉक्टर दीक्षित सरांचे विश्व मधुमेहमुक्त करायचे ध्येय लवकरच पूर्ण होईल अशी इच्छा बाळगूया.


